इंधन दरवाढीच्या विरोधात रत्नागिरी जिल्हा व खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पाक्षाच्या वतीने दिनांक ५/७/२०२१ रोजी केंद्र सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. वाढती महागाई आटोक्यात आणण्यासाठी तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले. केंद्र सरकारने डिझेल व पेट्रोलचे दर भरमसाठ वाढवले आहेत. त्याचप्रमाणे सर्व सामान्य घरगुती वापरासाठी लागणारे गॅस सिलिंडरचे दरसुध्दा वाढवले आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहेच. पण सर्व सामान्य नागरिकांनी जगावे की मरावे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
सध्याच्या कोविड १९ महामारीच्या काळात केंद्र सरकारने जनतेस आधार देणे गरजेचे असतानाच या कृषी प्रधान देशात सर्व रासायनिक खतांच्या किंमती सध्याच्या भावापेक्षा ४० टक्के वाढविल्या आहेत. त्यामुळे आताच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना केंद्र सरकारने मदत करण्याऐवजी रासायनिक खतांचे दर वाढवून शेतकऱ्यांना उध्दवस्त करण्याचे काम केले आहे. या प्रवृत्तीचा आम्ही रत्नागिरी जिल्हा व खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने जाहीर निषेध करीत आहोत. आमच्या भावना आपल्यामार्फत केंद्र सरकारला कळविण्यात याव्यात. तरी रासायनिक खतांच्या वाढविलेल्या किंमती ताबोडतोब कमी कराव्यात तसेच पेट्रोल डिझेल व घरगुती गॅस सिलिंडरचे दर कमी करावे अशी आमची मागणी आहे.
याप्रसंगी सौ.जयमाला पाटणे महिलाशहर अध्यक्ष व नगरसेविका खेड नगरपरिषद, सौ.पूजा तलाठी, युवती शहर अध्यक्ष निधी विटमल, महिला तालुका अध्यक्ष समीक्षा कदम, युवती तालुका अध्यक्ष, सौ.मितल धारिया, सौ.दिव्या पाथरे, सौ.उन्नती खेडेकर आंदोलनात सहभागी झाले होते.
यावेळी दापोली विधानसभा मतदार संघाचे मा.आमदार श्री.संजयराव कदम,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष व रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष श्री.बाबाजीराव जाधव, तालुकाध्यक्ष श्री.सतु कदम, पंचायत समिती सदस्य अॅड श्री.डफळे, श्री.जलाल भाई, श्री.आंब्रे, युवक तालुकाध्यक्ष अँड श्री.अश्विन भोसले, माजी पंचायत समिती सदस्य श्री.श्रीधर गवळी, नगरसेवक श्री.अजय माने, माजी नगरसेवक श्री.राजु शेठ संसारे, भरणे ग्रामपंचायत सरपंच श्री.संदीप खेराडे, ग्रामपंचायत सदस्य श्री.संतोष गोवळकर, श्री.गोविंद राठोड, श्री.मनोज कदम आदी उपस्थित होते