गुहागर तालुक्यातील निर्मळ ग्रुप ग्रामपंचायत आवरे-असोरे कार्यक्षेत्रातील मौजे.असोरे (कुणबीवाडी) या गावात जिल्हा परिषद रत्नागिरी, बांधकाम विभाग गुहागर यांची जनसुविधा योजना सन-२०२१-२२ अंतर्गत असोरे (कुणबीवाडी) सभागृह ते ग्रामपंचायत कार्यालय येथील कच्च्या रस्त्याचे काम पूर्ण झाले असल्याने सदर रस्ता वाहतुकीसाठी मुख्य प्रवाहात आला असून तो आबलोली – रत्नागिरी महामार्गाला जोडला गेला असल्याने येथील ग्रामस्थ जनतेची मोठी गैरसोय दूर झाली आहे.
सदर रस्त्याचे उद्घाटन गुहागर तालुका आमदार – भास्करराव जाधव यांच्या शुभहस्ते व्हावे अशी समस्त ग्रामस्थ जनतेची इच्छा होती सदर बाबत आमदार भास्करराव जाधव यांना विनंतीही करण्यात आली होती. परंतु सदर दिवशी त्यांना तातडीच्या कामानिमित्त मुबंई यावे लागल्याने आमदार भास्करराव जाधव यांनी ग्रामस्थांना आपुलकीची सूचना करत माझ्या अनुउपस्थितीत सदर रस्त्याचे उद्घाटन गावातील जेष्ठ नागरिक अथवा कार्यकर्ते यांच्या हस्ते करून घ्यावे, सदर सूचनेचा मान राखत समस्त असोरे ग्रामस्थांनी सकारात्मक निर्णय घेऊन शुक्रवार दिनांक १२ मे २०२३ रोजी सार्वजनिक श्री सत्यनारायण पूजेचे औचित्य साधत असोरे गावातील आदर्श व्यक्तिमत्त्व, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते,सांघिक विकास साधत, स्नेह-प्रेम माणुसकी, जिव्हाळा जपत समाजसेवेची कास धरणारे, “कुणबीवाडी विकास मंडळाचे” संस्थापक व माजी अध्यक्ष, तसेच समाजरत्न पुरस्कार सन्मानित-शांताराम गोपाळ घडशी यांच्या शुभहस्ते सदर रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले.
असोरे ग्रामस्थ जनतेसाठी हा एक ऐतिहासिक असा सुवर्ण क्षण होता.सदर प्रसंगी मंडळाची कार्यकारणी,गावातील जेष्ठ कार्यकर्ते, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Welcome...
https://ratnagiri24news.com
'रत्नागिरी 24 न्यूज' वेबपोर्टल रत्नागिरीकरांच आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. कोणतंही वैचारीक, आर्थिक वा राजकीय जोखड नसलेला हा सर्वसामान्यांसाठी स्वतंत्र पत्रकारितेचा एक डिजिटल मिडीया प्लॅटफॉर्म आहे. आपल्या भागातील समस्या, घटना, बातम्या आमच्या 9527509806 या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवा.
- टीम 'रत्नागिरी 24 न्यूज'
This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy. I Agree
महानगरांसह जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडींसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा. बातम्यांसोबत संग्राह्य माहितीचा खजानाही !