(जाकादेवी/संतोष पवार)
रत्नागिरी तालुक्यातील चाफे येथील मोहिनी मुरारी शिक्षण संस्थेतर्फे जाकादेवी मंदिरापासून ते चाफे येथील मोहिनी मुरारी मयेकर महाविद्यालयाच्या श्री.गोपाळ कृष्ण मंदिरापर्यंत सुमारे तीन किलोमीटर अंतरापर्यंत वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडीत चाफे येथील मोहिनी मुरारी मयेकर महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच जाकादेवी प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयातील निवडक विद्यार्थी वारकरी गणवेशामध्ये मोठ्या भक्तिभावाने व उत्साहाने सहभागी झाले होते.
या वारकरी दिंडीमध्ये मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे तसेच मोहिनी मुरारी मयेकर शिक्षण संस्थेचे चेअरमन सुनिल उर्फ बंधू मयेकर, उपाध्यक्ष काका साळवी, सचिव रोहित मयेकर, ऋषिकेश मयेकर, संचालक सुरेंद्र माचिवले ,श्रीमती दिप्ती मयेकर ,शुभदा मयेकर , मालगुंड शिक्षण संस्थेचे सचिव विनायक राऊत , संचालक किशोर पाटील, श्रीकांत मेहेंदळे,चाफे गावच्या सरपंच सौ.गोवळकर,ओरीचे उपसरपंच संकेत देसाई, महाविद्यालयाच्या प्राचार्या स्नेहा पालये, उपप्राचार्य गणेश कुळकर्णी,जाकादेवी प्रशालेचे मुख्याध्यापक बिपिन परकर, शिरीष मुरारी मयेकर विद्यालयाचे मुख्याध्यापक महेश धनवडे,वृत्तसंकलन संतोष पवार यांसह शिक्षण संस्थांचे पदाधिकारी, शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, हितचिंतक बहुसंख्येने उपस्थित होते.
या वारकरी दिंडीमुळे जाकादेवी चाफे परिसरातील नागरिकांमध्ये भक्तीभावाचे वातावरण निर्माण झाले. यापुढे प्रत्येक वर्षी मोहिनी मुरारी शिक्षण संस्थेतर्फे भव्य वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे युवा नेते व शिक्षण संस्थेचे सचिव रोहित मयेकर यांनी आवर्जून सांगितले. दिंडीत सहभागी विद्यार्थी वारकरी व मार्गदर्शक शिक्षक,जाकादेवी देवस्थान मंडळ तसेच विद्यार्थी, विद्यार्थ्यांचे पालक यांना चेअरमन सुनिल मयेकर यांनी मनापासून धन्यवाद दिले.