आशिया कप 2023 काही दिवसांवर आला आहे. ही स्पर्धा ३० ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात मुलतान येथे होणार आहे. तर अंतिम सामना १७ सप्टेंबर रोजी कोलंबोत होणार आहे. तर टीम इंडियाचा पहिलाच सामना हा 2 सप्टेंबरला पाकिस्तान विरुद्ध असणार आहे. आशिया कपमध्ये एकूण ६ संघ सहभागी होणार आहेत. आशिया कप 2023 स्पर्धेतील सर्व सामने हे भारतात स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येतील. तसेच डीडी स्पोर्ट्सवरही सामने पाहता येतील.
आशिया कपमधील सामन्यांना भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे. स्पर्धेतील सामने हे मुल्तान, लाहोर, कँडी आणि कोलंबो शहरात पार पडणार आहेत.आतापर्यंत फक्त भारत, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ आणि अफगाणिस्तान या संघांनी या स्पर्धेसाठी अधिकृतपणे त्यांचे संघ जाहीर केले आहेत. श्रीलंकेचाही संघ निश्चित झाला आहे. पण, त्यांच्या क्रीडा मंत्रालयाकडून या संघाला अद्याप मंजुरी मिळालेली नाही.
आशिया कपसाठी सर्व संघ
आशिया कपसाठी पाकिस्तान संघ – अब्दुल्ला शफीक, फखर जमान, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), सलमान अली आगा, इफ्तिखार अहमद, तय्यब ताहिर, सौद शकील, मोहम्मद रिझवान, मोहम्मद हारिस, शादाब खान, मोहम्मद नवाज , उसामा मीर, फहीम अश्रफ, हारिस रौफ, मोहम्मद वसीम, नसीम शाह आणि शाहीन आफ्रिदी.
आशिया चषक स्पर्धेसाठी बांगलादेश संघ – शाकिब अल हसन (कर्णधार), लिटन दास, तनजीद तमीम, नजमुल हुसेन शांतो, तौहीद हृदोय, मुशफिकुर रहीम, मेहदी हसन मिराज, तस्कीन अहमद, मुस्तफिजुर रहमान, हसन महमूद, शेख महेदी, नसीम अहमद, नजमुल हुसेन हुसेन, अफिफ हुसेन, शोरफुल इस्लाम, अबदोत हुसेन, नईम शेख.
आशिया कपसाठी भारताचा संघ – रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, केएल राहुल, इशान किशन, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल , कुलदीप यादव , जसप्रीत बुमराह , मोहम्मद. शमी, मोहम्मद. सिराज, प्रसीध कृष्ण.
आशिया चषक स्पर्धेसाठी अफगाणिस्तान संघ: रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झद्रान, रियाझ हसन, रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), नजीबुल्ला जद्रान, राशिद खान, इक्रम अलीखली, करीम जनात, गुलबद्दीन नायब, मोहम्मद नही, मुजीब उर रहमान, फझलहक फारुकी, शराफुद्दीन, शराफउद्दीन. नूर अहमद, अदबुल रहमान, मोहम्मद सलीम.
आशिया कपसाठी नेपाळ संघ– रोहित कुमार पौडेल (कर्णधार), महमद आसिफ शेख, कुशल भुर्तेल, ललित नारायण राजबंशी, भीम सरकी, कुशल मल्ला, दीपेंद्र सिंग आयरे, संदीप लामिछाने, करण केसी, गुलशन कुमार झा, आरिफ शेख, सोमपाल कामी, प्रतिस जीसी, किशोर महतो, संदीप जोरा, अर्जुन सौद आणि श्याम ढकल.