(मुंबई)
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीला आणि जावयाला मारण्याबाबतची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर आव्हाड समर्थकांनी ठाणे महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना ठाणे महापालिकेच्या बाहेर मारहाण केली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात जाऊन नौपाडा पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
दरम्यान, या संपूर्ण घडामोडीनंतर जितेंद्र आव्हाड यांच्या कन्या नताशा या नौपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबीयांना मारण्याबाबतची व्हायरल झालेल्या ऑडिओमध्ये आव्हाड यांच्या मुलीला आणि जावयाला मारण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. आव्हाड यांची मुलगी नताशा आणि जावई यांचा स्पेनमधील पत्ता शोधला असल्याचा ऑडिओमध्ये उल्लेख आहे. या व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे एकच खळबळ उडाली आहे.
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना धडा शिकवण्याची भाषा करत आव्हाड व त्यांच्या कुटुंबाला संपवण्यासाठी तिहार जेलमध्ये असलेला गँगस्टर बाबाजी उर्फ सुभाषसिंग ठाकूरयाला सुपारी दिल्याचे संभाषण असणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आव्हाड यांना मारण्यासाठी शूटर तैनात केले असल्याची कबुली देणारी ठाणे महानगर पालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर ठाण्यात खळबळ माजली आहे. दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी याबद्दल आपण कोणतीही तक्रार दाखल करणार नसल्याचे म्हटले आहे. ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर महेश आहेर यांना जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांकडून मारहाण करण्यात आली आहे.
दरम्यान, या संपूर्ण घडामोडींनंतर आता जितेंद्र आव्हाड यांनी महेश आहेर यांच्या केबिनमध्ये त्यांचा सगळा जमा खर्च सांभाळणारे म्हाडसे नावाची व्यक्ती असल्याचा आरोप केला आहे. तसा एक व्हिडिओदेखील नुकताच जितेंद्र आव्हाड यांच्यावतीने ट्विट करण्यात आला आहे.
आयुक्त मारहाणप्रकरणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अटक
या घटनेनंतर ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात जाऊन नौपाडा पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, या संपूर्ण घडामोडीनंतर जितेंद्र आव्हाड यांच्या कन्या नताशा या नौपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.