(मुंबई)
मुंबई महानगर क्षेत्रात आर्थिक दुर्बल घटकांसाठी (EWS) प्रधानमंत्री आवास योजनेतील परवडणाऱ्या घरांसाठी उत्पन्न मर्यादेत वाढ करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे, उत्पन्नाची मर्यादा आता तीन लाखांवरुन सहा लाख रुपये करण्यात आली असून या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांचे आभार मानले आहेत.
प्रधानमंत्री आवाज योजनेंतर्गत परवडणाऱ्या घरांसाठी लागू असलेला आर्थिक कमकुवत घटकांसाठीच्या निकषात आता बदल झाला आहे. हा बदल मुंबई महानगर क्षेत्रासाठी लागू आहे. सुरुवातीला आर्थिक कमकुवत घटक म्हणून असलेला 3 लाखांचा निकष आता 6 लाखांवर नेण्यात आला आहे. त्यामुळे त्याचा फायदा शेकडो नागरिकांना होणार असल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. राज्य सरकार त्यासाठी प्रयत्नशील होते. राज्य सरकारच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे.केंद्र सरकारने तसा निर्णय घेतल्याचे फडणवीस म्हणाले.
या निर्णयामुळे म्हाडा, सिडकोच्या घरांसाठी अर्ज करणाऱ्या लाखो नागरिकांना दिलासा मिळाला असून सर्वसामान्यांचं हक्काच्या घराचं स्वप्न साकार होण्यास मदत होणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना (नागरी) अंतर्गत मुंबई महानगर क्षेत्रासाठी आर्थिक दुर्बल घटकांसठी उत्पन्नाचे निकष तीन लाखांवरून सहा लाख रुपये करण्याची विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्राकडे २१ जून २०२३ रोजी पत्राद्वारे केली होती.
मुंबई महानगर क्षेत्रात आर्थिक दुर्बल घटकांसाठी (EWS) प्रधानमंत्री आवास योजनेतील परवडणाऱ्या घरांसाठी उत्पन्न मर्यादेत वाढ करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे, उत्पन्नाची मर्यादा आता तीन लाखांवरुन सहा लाख रुपये करण्यात आली असून या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री @mieknathshinde… pic.twitter.com/QUGg1eq8uT
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 13, 2023
तर मुख्यमंत्री शिंदे यांनी केंद्रकाडे विनंती केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. अखेर या विनंतीला केंद्राने सकारात्मक प्रतिसाद देऊन उत्पन्नाच्या निकषात वाढ केली असल्याचे राज्य शासनाला कळविले आहे.