आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता तुमचे मनही वाचून ते शब्दातही मांडू शकणार आहे. ऑस्टिन येथील युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सासच्या शास्त्रज्ञांच्या टीमने हे एआय मॉडेल विकसित केले आहे. अभ्यासानुसार, ते रिअल टाइममध्ये तुमच्या मेंदूचे वाचन आणि लिखाणही करू शकते. या अहवालाचे नेतृत्व जेरी तांग, संगणक विज्ञानातील डॉक्टरेट विद्यार्थी आणि यूटी ऑस्टिन येथील न्यूरोसायन्स आणि संगणक विज्ञानाचे सहायक प्राध्यापक एलेक्स हथ यांनी केले. हा अभ्यास अंशतः गुगल बार्ड आणि ओपन एआयच्या चॅटजिपीटी सारख्या ट्रान्सफॉर्मर मॉडेलवर आधारित आहे. हे एआय टूल पक्षाघात झालेल्या रुग्णांसाठी आणि अपंगांसाठी वरदान ठरणार आहे. हे साधन एआय आधारित डीकोडर आहे जे मेंदूचा मागोवा घेते आणि एखादी व्यक्ती काय विचार करत आहे किंवा त्याच्या मनात काय चालले आहे याचा अंदाज घेते. या संशोधनादरम्यान तीन लोकांचे एमआरआय स्कॅन करण्यात आले. एकूणच संशोधनानंतर शास्त्रज्ञांनी हा दावा केला आहे.
आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ज्याला AI या नावाने ओळखले जाते. AI जगभरामध्ये प्रसिद्ध असलेली एक टेक्नॉलॉजी आहे. ज्या प्रमाणे मानवाला विचार करण्याची क्षमता आहेत व मनुष्य विचार करायचा या क्षमतेच्या माध्यमातून स्वतःचे निर्णय स्वतः घेतो त्याचप्रमाणे मानव बुद्धिमत्ता प्रमाणे मशिनरी ला देखील बुद्धिमत्ता देण्यात आली आहे ज्याला कृत्रिम बुद्धिमत्ता असे म्हणतात.
येणाऱ्या काळामध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्स हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये महत्त्वाचा भाग बनणार आहे. आजच्या काळामध्ये रोबोट सारख्या मशिनरीची निर्मिती झाली आहे, ज्या मानवाप्रमाणे बोलतात मानवाप्रमाणे कार्य करतात. तसेच ज्याप्रमाणे मनुष्य स्वतःच्या बुद्धीने कार्य करतो तसेच ह्या मशनरी देखील स्वतःच्या बुद्धीने कार्य करतात. त्यालाच आर्टिफिशिअल इंटेलिजन्स चा अविष्कार म्हटले आहे.
जेव्हा लॅपटॉप मध्ये किंवा कॉम्प्युटर मध्ये काम करत असतो तेव्हा आपण जे काही कमांड कम्प्युटरला देतो त्यानुसार आपले कंप्यूटर काम करते, परंतु आर्टिफिशिअल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमतेमध्ये मशीन स्वतःहून निर्णय घेते आपल्या बुद्धिमतेनुसार कमांड तयार करते की पुढे काम काय व कसे करायचे आहे.
जॉन मॅककार्थी यांनी 1956 साली आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा शोध लावला होता. तसेच कालांतराने ह्या तंत्रज्ञानाला खूप मागणी वाढू लागली. वर्तमान काळामध्ये देखील सर्व क्षेत्रामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा वापर केला जातो येणाऱ्या भविष्यामध्ये तर आर्टिफिशिअल इंटेलिजन्स हे तंत्रज्ञान प्रत्येक मनुष्याच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनवणार आहे.