(देवरुख / वार्ताहर)
संगमेश्वर तालुक्यातील ग्रामपंचायत आबंवली व आरोग्यवर्दिनी धामापूर अंतर्गत उपकेंद्र आबवंली यांच्या सयुक्त विघमाने आरोग्य शिबीर नुकतेच सपन्न झाले.
या शिबिरात अससर्गजन्य रोग कार्यक्रम अंतर्गत तपासणी,विविध रक्तचाचण्या, डेग्यू मलेरीया तपासणी ,नेत्र व मोतिबिंदू तपासणी ,आयुष्यमान गोल्डन कार्ड विषयक माहीती ,आभा कार्ड नोंदणी, मातृवंदना योजना माहीती, क्षयरोग,कृष्ठरोग विषयी जनजागृती, कर्करोग बाबतची आरोग्यविषयक माहीती ,पावळ्यातील साथीबाबतचे मार्गदर्शन, पाणीशुध्दिकरण ,आयोडिन बाबत जनजागृती अशाप्रकारे विविध उपक्रम राबविण्यात आले.
या कार्यक्रम सरपंच दिक्षा सावंत, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, धामापूर आरोग्यवर्दीनीचे डाॅ.भक्ती वाजे वैघकिय अधिकारी, डाॅ.वैभव हातिम, वैघकिय अधिकारी, अशोक बोरसे आरोग्य सहाय्यक, स्वाती गुरव आरोग्य सहाय्यिका, सुर्यवंशी सामुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्यसेविका, आशासेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस श्रीम.पवार, ग्रामसेविका श्रीम.नटे, ग्रामपंचायत कर्मचारी यांनी यशस्वी केला
या कार्यक्रमात लायन्स आय हाॅस्पिटल यांच्यावतीने मोफत नेत्र तपासणी मोतिबिंदू तपासणी करुन आबंवली गावातील ९ लाभार्थ्यांना मोफत मोतिबिंदू आॅपरेशन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे नियोजन ग्रामपंचायत आबंवली व आरोग्यवर्दिनी आबंवली यांनी केले. सुत्रसंचालन प्रकाश झोरे, आरोग्य सेवक आबंवली यांनी केले.