(गुहागर)
रोजगारासाठी मुंबईची वाट न धरता गावाकडे असलेले काही तरुण वन्य प्राण्यांकडून अनेकदा नुकसान होऊनही शेतीत प्रयोग करण्यासाठी धडपडत आहेत, हे अभिमानास्पद असल्याचे मत सरपंच समित घाणेकर यांनी व्यक्त केले.
पंचायत समिती गुहागर व कृषी विभाग जि. प. रत्नागिरी यांच्या विद्यमाने हळद लागवडीच्या नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत आरे- पिंपळवट येथील तरुण शेतकरी सतीश धावडे यांच्या शेतावर एसके ४ हळद रोपांची लागवड करण्यात आली. यावेळी सरपंच समित घाणेकर यांनी आपले मत व्यक्त केले. या तरुणांना पंचायत समितीचा कृषी विभाग सतत योग्य मार्गदर्शन करत असल्याने त्यांनी समाधानही व्यक्त केले.
यावेळी पिंपळवट गावचे अध्यक्ष प्रभाकर धावडे, नरेश धावडे, कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर, जयेश पागडे, कुणाल गावडे, श्वेता पागडे, रोहिणी गावडे, काजल धावडे, शेतकरी सतीश धावडे, शिक्षक बोले, हिरा गोताड, प्रतीशा पवार आदी उपस्थित होते.