( नवी दिल्ली )
प्रदीर्घ प्रक्रियेनंतर HDFC लिमिटेड आणि HDFC बँकेच्या विलीनीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. एचडीएफसी बँकेने दिलेल्या माहितीत असे सांगण्यात आले की, त्याची मूळ कंपनी एचडीएफसी लिमिटेडमध्ये विलीनीकरणाच्या प्रस्तावाला भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) ची मंजूरी मिळाली आहे.
BSE आणि NSE आधीच मंजूर बँकेने सांगितले की, ‘HDFC ला RBI चे 4 जुलै 2022 चे पत्र प्राप्त झाले आहे. यामध्ये आरबीआयने या योजनेसाठी आपले ‘ना हरकत’ (एनओसी) दिले असून त्यासाठी काही अटी नमूद केल्या आहेत. विलीनीकरणासाठी काही वैधानिक आणि नियामक मान्यता आवश्यक असतील. दरम्यान या आठवड्याच्या सुरुवातीला, BSE आणि NSE कडून प्रस्तावित विलीनीकरणासाठी मंजुरी मिळाली होती.
18 लाख कोटींची एकत्रित मूळ मालमत्ता असेल सुमारे $40 बिलियनच्या या अधिग्रहणामुळे, वित्तीय सेवा क्षेत्रातील एक मोठी कंपनी अस्तित्वात येईल. एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेच्या विलीनीकरणामुळे ही कंपनी नवीन अस्तित्वात येईल. प्रस्तावित युनिटची एकत्रित मालमत्ता सुमारे 18 लाख कोटी रुपये असेल.
ग्राहकांवर काय परिणाम होईल?
एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेच्या विलीनीकरणाचा परिणाम ग्राहक आणि भागधारक दोघांवर होईल. प्रत्येक HDFC शेअरधारकाला HDFC च्या 25 शेअर्ससाठी HDFC बँकेचे 42 शेअर्स मिळतील. एचडीएफसीचे विद्यमान भागधारक एचडीएफसी बँकेत 41 टक्के हिस्सेदारी ठेवतील. यानंतर, एचडीएफसी बँकेची संपूर्ण मालकी सार्वजनिक भागधारकांच्या हातात असेल.