(गुहागर)
रत्नागिरी गॅस प्रकल्पाला वाह्न मालकांकडून पुरविल्या जाणाऱ्या अनेक बसचे गाडी क्रमांक डमी असल्याचे समोर आले आहे. या बस पुण्यातील असून नंबर बदलून वाहतूक करत आहेत. अशा दोन बसेसवर प्रादेशिक परिवहन विभाग, रत्नागिरीकडून कारवाई करण्यात आली आहे. मात्र, ही कारवाई केवळ तात्पुरती असल्याची चर्चा वाहनचालकांमधून सुरु असून जिल्ह्यात अशा पध्दतीने धावणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
रत्नागिरी गॅस प्रकल्पाला कित्येक वाहन मालक आपली वाहने पुरवितात. काही वाहन मालक हे जिल्ह्याच्या बाहेरचे असतात. मात्र, ते स्थानिकांना गाठून त्यांच्याकरवी आपल्या भागात वाहनांचे नंबर बदलून व खोटे नंबर लावून सेवेत देतात. अशा प्रकारच्या बस आरजीपीपीएल प्रकल्पात पुरविण्यात आलेल्या असल्याचे समोर आले आहे.
यातील दोन बसवर रत्नागिरी आरटीओने कारवाई करून या दोन बस गुहागरातील आहेत. या बस गेले वर्षभर सुरु होत्या. आरटीओने अधिक चौकशी व तपासणी केली तर अजून बरीच वाहने सापडू शकतात, असे काही वाहनचालकांनी सांगितले. जिल्ह्यात आरटीओने मोहिम उघडल्यास डमी नंबरने धावणारी वाहने नक्कीच सापडतील. आरटीओने अशी धडक मोहिम राबवावी, अशी मागणी आता होत आहे.