कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता व महाराष्ट्रात रक्ताचा जाणवत असलेला तुटवडा लक्षात घेता आमदार शेखरजी निकम यांनी वॅक्सीन पूर्वी रक्तदान करा या आवाहनानुसार जिल्हा परिषद पेढे राष्ट्रवादी गटाच्या वतीने माहेश्वरी भवन कळंबस्ते येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिराचे उदघाटन तालुक्याचे प्रांताधिकारी मा. प्रवीण पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला मा. आमदार शेखरजी निकम व मा. तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले. शेखर निकम म्हणाले कि येणाऱ्या आगामी काळात हि अशाच शिबिरांचे आयोजन करण्याचा मानस आहे आदरणीय पवार साहेब , मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री यांनी हि अशा शिबिरांचे नियोजन करा असे आवाहन केले आहे . आज पत्रकार दिन आणि शिबिराचे आयोजन ह्या चांगल्या शुभेच्या. मा. तहसीलदार साहेब यांनी हि शिबिराचे कौतुक केले.
या कार्यक्रमाला आमदार शेखरजी निकम , प्रांत प्रवीण पवार , तहसीलदार जयराज सूर्यवंशी, महिला जिल्हाध्यक्ष चित्रा चव्हाण, युवती जिल्हाध्यक्ष दिशा दाभोलकर, पंचायत समिती सदस्य नितीन ठसाळे मान्यवर उपस्थित होते तसेच हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी मोहन शिंदे , सुधीर भोसले, तुषार गमरे, माजी सरपंच जया राक्षे , संजय गमरे , गुरव समाजचे नेते प्रकाश पवार ,गजानन कदम , राजन गणपुले, बबन पडवेकर, निलेश कदम, सनी मयेकर, समीर पवार, रवींद्र आयरे, नितीन भुवड, कल्पेश भुवड, बावा सुर्वे , सचिन शिंदे , राहुल शिंदे , अजय महाडिक , विलास महाडिक, सुधीर महाडिक , बबलू महाडिक , दीपक खेडेकर , सीताराम घाडगे, सचिन घाडगे, अंकुश घाडगे , जयवंत अदावडे , पांडुरंग पिलावरे, संजय जाधव, महेश महाडिक , रोहन इंगवले, कल्पेश भुवड, सतीश कदम , संकेत निकम ,”काशिनाथ इंगवले आदींनी मेहनत घेतली .