ऑनलाइन उपस्थितांचे स्वागत कार्याध्यक्षा सौ. ऋतुजा कुळकर्णी यांनी तर प्रास्ताविक उपाध्यक्षा सौ. मुग्धा कुळ्ये यांनी केले. यानंतर गेल्या आठवड्यात घेतला गेलेल्या “नाते तुझे नि माझे” या लेख उपक्रमातील लेखांचे ई-बुक आम्ही विश्व लेखिका रत्नागिरी जिल्हा अध्यक्षा सौ सुनेत्रा जोशी यांच्या हस्ते प्रकाशन झाले . या ई बुक चे सर्व काम समूह सदस्या सायली पिलणकर हिने केले. मग काव्य संमेलनाला सुरवात झाली.
यात सौ. सुनेत्रा जोशी, सौ. ऋतुजा कुळकर्णी, सौ. मुग्धा कुळ्ये, सौ. अनुराधा दीक्षित, सौ. मनीषा पटवर्धन, सौ. लता जोशी, सौ. अमृता नरसाळे, सौ. अर्चना देवधर, सौ. शमा प्रभुदेसाई रेमणे, सौ. कश्मिरा पालेकर, सौ. उमा जोशी, सौ.स्नेहल तुळसणकर, सौ. रेखा जगलकर, अनुप्रीता कोकजे, सौ. मीनल ओक यांनी आपल्या कविता सादर केल्या.
आषाढ पाऊस, आषाढ पहिला दिवस, आषाढी एकादशी, गुरुपौर्णिमा , वारी, अशा विषयांवर सुरेख श्रवणीय कविता सर्व महिलांनी सादर केल्या. सर्वच कवितांत विविधता होती व नवीन विचार होता. सर्वच कवयित्री प्रत्येक कवितेला दिलखुलास दाद देत होत्या हे कार्यक्रमाचे विशेष म्हणावे लागेल. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुप्रीता कोकजे यांनी केले. कोव्हीड च्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन काव्य संमेलन इतके दर्जेदार होते तर ऑफलाईन साहित्य संमेलन कोकण विभागाला नक्कीच वेगळ्या उंचीवर पोचवणारे ठरले.