(खेड)
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळा मधील गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या तसेच विद्यार्थी व शिक्षकांच्या न्याय संगत मागण्या शासन स्तरावर प्रदीर्घकाळ प्रलंबित आहेत सदर मागण्या समजून घेऊन त्यांची सोडवणूक करण्यासाठी शासन पातळीवर कोणतीच अपेक्षित कार्यवाही होत नाही. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी आज सोमवार दिनांक ८ ऑगस्ट २०२२ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय, प्रांत कार्यालय, तहसील कार्यालय या ठिकाणी दुपारी ३.०० ते ५.०० या वेळेत धरणे आंदोलन करण्यात आले
संपूर्ण राज्यभर होणाऱ्या राज्याच्या नियोजनाप्रमाणेच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जिल्हाध्यक्ष श्री.प्रकाश काजवे व जिल्हा पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मंडणगड, दापोली, खेड या तीन तालुक्यांचे आंदोलन उपविभागीय अधिकारी कार्यालय दापोली येथे , गुहागर संगमेश्वर, चिपळूण या तीन तालुक्यांचे आंदोलन उपविभागीय अधिकारी कार्यालय चिपळूण तर राजापूर, लांजा, रत्नागिरी या तीन तालुक्यांचे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी या ठिकाणी करण्यात आले महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या राज्य शाखेने शासनाला सादर केलेल्या विविध अडतीस मागण्याची निवेदन देण्यात आले. याकडे लक्ष वेधून त्याची सोडवणूक करून घेणेसाठी हे आंदोलन संपूर्ण राज्यभर एकच दिवशी करण्यात आले
जिल्हा शाखेच्या नियोजनानुसार मंडणगड, दापोली, खेड या तीन तालुक्यांचे उपविभागीय अधिकारी कार्यालय दापोली येथे झालेले आंदोलन जिल्हा कार्याध्यक्ष श्री.अजित भोसले यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष श्री. दिनेश झोरे, श्री.विनायक वाळंज, जिल्हा सल्लागार श्री.परशुराम पेवेकर, जिल्हा संघटक श्री.संजय गडाळे, श्री. देविदास ठोंबरे, श्री.मंगेश कडवईकर, जिल्हा महिला प्रतिनिधी सौ. मनाली कासारे यांच्या मार्गदर्शनानुसार खेड सचिव श्री.अशोक आकुसकर, मंडणगड तालुका अध्यक्ष श्री.वैभव भोसले सचिव श्री.उमेश सापटे, दापोली तालुकाध्यक्ष श्री.जावेद शेख सचिव श्री.दिनेश चव्हाण यांचेसह तालुका पदाधिकारी व सर्व शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते.