(रत्नागिरी)
अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित करणाच्या ‘त्या’ तीन संशयितांच जामीन अर्ज न्यायालयाने बुधवारी फेटाळून लावला. त्यांच्याविरोधात पीडितेने जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.
या तक्रारी त्यानुसार, १९ फेब्रुवारी ते ६ मार्च २०२३ या कालावधीत खंडाळा व दिवा मुंबई, साटरेबांबर येथे पीडित मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यावरून पोलिसांनी यज्ञेश अनंत धनावडे, प्रतीक संतोष ताम्हणकर, रूतिकेश रवींद्र शिंदे यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३७६ (२) (जे) ३७६ (२) (एन) लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२चे कलम ४, ६, ९ (एल) प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान, जयगड पोलिसांनी संशयितांना अटक केली होती. पोलिस कोठडी नंतर संशयित सध्या न्यायालयिन कोठडीत असून, त्यांनी जामिन अर्ज दाखल केला होता. बुधवारी त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला.