(मुंबई)
एअर अँब्युलन्सद्वारे मुंबईत आला आहे. औरंगाबादच्या सिग्मा हॉस्पिटलमध्ये उपचार केल्यानंतर शिरसाट यांना एअर अँब्युलन्सद्वारे मुंबईत आणून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा निर्णय झाला आहे.
आमदार संजय शिरसाट यांना काल (सोमवार 17 ऑक्टोबर 2022) हृदयविकाराचा झटका आला. यानंतर त्यांना तातडीने औरंगाबादच्या सिग्मा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे काल दुपारपासून शिरसाट यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर आज (मंगळवार 18 ऑक्टोबर 2022) सकाळी शिरसाट यांना एअर अँब्युलन्सद्वारे मुंबईत आणून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा निर्णय झाला आहे.
संजय शिरसाट हे औरंगाबाद पश्चिम मतदारसंघाचे आमदार आहे. राजकारण येण्याआधी ते रिक्षा व्यावसायिक होते. 1985 साली त्यांनी शिवसेनेतून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली होती. 2000 साली ते नगरसेवक म्हणून निवडून आले होते. 2003 मध्ये संजय शिरसाट यांची स्थायी समितीच्या सभापतीपदी नियुक्ती करण्यात आली होती. 2005 मध्ये ते पुन्हा नगरसेवक बनले होते. त्यानंतर 2009 साली पहिल्यांदा ते आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर झालेल्या 2014 सालच्या निवडणुकीतही ते विजयी झाले.