(फुणगूस / एजाज पटेल)
तालुक्यातील कोंड उमरे रस्ता ते उमरे मेन रस्ता या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ चिपळूण, संगमेश्वरचे कार्यसम्राट आमदार श्री. शेखर निकम यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवुन करण्यात करण्यात आला. यावेळी ग्रामस्थांच्या सत्काराला उत्तर देताना तरुण वर्गाने मुंबई आदि शराकडे न जाता वा गावच्या जमिनी मातीमोल भावात न विकता शेती पुरक व्यवसयाकडे वळlवे असे आवाहन त्यांनी केले.
नायरी मुख्य रस्त्यापासून नजिकचा हा रस्ता कोंड उमरे ते उमरे या दोन गावांना जोडणारा एक महत्वाचा दुवा आहे. उमरे गावामध्ये पोस्ट ऑफिस, ग्रामपंचायत, मुळ काळीश्री देवी मंदिर आहे तसेच कोंड उमरे येथे शासनाचे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. त्यामुळे उमरे येथील ग्रामस्थना बारा किमीचे अंतर कापून रिक्षाला दोनशे ते आडीचशे रुपये खर्च करावे लागतात. त्यामुळे हा रस्ता होताच रुग्णांना वेळीच उपचार मिळून वेळ, पैसा वाचणार आहे.
शिमगोत्सवात उमरे गावच्या देवीची पालखी कोंड उमरे गावी प्रतिवर्षी परंपरेनुसार येत असते. पुर्वी जगलातुन जाणारी ही पायवट रस्त्यामध्ये रूपांतरीत होणार असल्याने दोन्ही गावच्या ग्रामस्थांच्या आनंदाची आणि सोयीची बाब होणार आहे. एकुण सव्वा कोटी रुपयांचे अंदाजपत्रक असलेला हा रस्ता टप्प्याटप्प्याने पुर्णत्वास जाणार असुन पहिल्या 470 मीटरसाठीच्या रस्त्यासाठी 15 लाख रुपयांचा निधी मंजुर झाला असुन आमदारांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. लवकरच या कामाला सुरवात होणार असल्याने गेली कित्येक वर्षाचे या रस्त्याचे स्वप्न होताना पाहुन ग्रामस्थानी निकम यांना धन्यवाद दिले.
1979 मधे ग्रामस्थानी हा रस्ता रोजगार हमी मधुन तयार केला होता. मात्र हा रस्ता योजनाबाह्य प्रकारात मोडत असल्याने या रस्त्याला एकाच वेळी एवढा मोठा निधी मिळणे शक्य नसल्याचे आमदार निकम यांनी सांगितले. या गावासाठी विकासकामासाठी सतत हिरहिरीने काम करणारे ग्रामस्थ श्री प्रवीण जाधव यांनी शासनाकडे सातत्याने विविध पातळीवर पाठपुरावा करून नाम. उदय सामंत यांच्या सहकार्याने पहिल्या टप्प्याचा निधी शासनाकडून मंजुर करून घेतला आहे याचे सर्व स्रेय हे प्रवीण जाधव यांचे असून मी मात्र निमित्त असल्याचे निकम यांनी आवर्जून सांगितले.
याच वेळी हा रस्ता पुर्ण होण्यासाठी आपण स्वतः प्रयत्न करणार असून उर्वरित रस्त्याचे काम डोंगरी विकास मधुन करण्यात येईल आणि येत्या वर्षी देवींची पालखी याच रस्त्याने येईल आणि लवकरात लवकर हा पुर्ण रस्ता डांबरीकरण करण्याचे अभिवचन उपस्थितlना आमदार निकम यांनी दिले. यावेळी ग्रामस्थ्यांच्या वतीने आमदारांच्या हस्ते प्रवीण जाधव यांचा सत्कार करण्यात आला.
कोंड उमरे ग्रामस्थ मुंबई मंडळ अध्यक्ष श्री दिपक पवार, सेक्रटरी श्री सुहास पवार, कार्यअध्यक्ष श्री विकास पवार, गावचे अध्यक्ष श्री प्रमोद पवार, सल्लागार श्री राकेश बागवे, मुंबई मंडळ माजी अध्यक्ष राजेश बागवे, माजी सेक्रटरी दिलीप पवार, सामाजिक कार्यकर्ते, गावचे ग्रामस्थ प्रवीण जाधव, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष राजु पोमेंडकर, गट प्रमुख मज्जीद नेवरेकर, राम शिंदे, बाबा बेंडके, विश्वास तावडे, तांबु या कामाच्या ठेकेदार कु, प्रियांका जाधव आदि सह ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.