कोरोनाने हाहाकार माजवला असून रक्ताचा साठा पुरेसा नाही म्हणून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रक्तदान शिबिरे आयोजित करण्याचे आवाहान केले आहे. आवाहनाला प्रतिसाद देत आमदार शेखर निकम यांनी मतदार संघातील राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या कार्यकर्ते व पदाअधिकारी यांना रक्तदान मोहिम घेण्याचे सुचित केले आहे
आज रक्तदान मोहिमेतील ९ वे रक्तदान शिबिर संगमेश्वर तालुका राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या वतीने कडवई जि.प.गटामध्ये आयोजित
करण्यात आले होते यावेळी या रक्तदान मोहिमेमध्ये ७५ सहभाग घेऊन यामधील ५१ रक्तदत्यांनी रक्तदान केले.
या रक्तदान शिबिराचे उदघाटन प्रंसगी आमदार शेखर निकम,आर.डी.सी.बँकेचे संचालक राजेंद्र सुर्वे,अनिरुद्ध निकम,तुरळ सरपंच सौ.राधिका गिजये,उपसरपंच शंकर लिंगायत,कडवई उपसरपंच दत्ताराम ओकटे,माजी सरपंच संतोष भडवळकर,संतोष जाधव,रमेश डिके,दिलीप म्हादे,वंसत कदम,लिलाधर पंडित,संदिप चरकरी,काशीराम हरेकर,धोंडू डिके,राजेंद्र बोथरे,ग्रामविकास अधिकारी विनायक राजेर्शिके, पोलिसपाटील वर्षा सुर्वे आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.
हे रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी अमोल सुर्वे,विवेक सुर्वे,योगेश सुर्वे,गणेश सुर्वे,अनिकेत कुभांर ,नरेश सुवरे,सहदेव सुवरे,दिपक चव्हाण,कौस्तुभ सुर्वे यांनी विशेष मेहनत घेतली