(चिपळूण)
सावर्डे गाव हे रत्नागिरी जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी वसले आहे. मुंबई गोवा महामार्गाच्या बाजूला हे गाव असून यांस शिक्षणाची पंढरी असे संबोधले जाते. आजूबाजूच्या गावातील शिवकालीन मंदिरे गड किल्ले यासाठी येणारे पर्यटक, शिक्षण घेणारे बाहेरील विध्यार्थी तसेच गावाची असलेली लोकसंख्या याचा विचार करता मिळणारे पाणी खूपच कमी प्रमाणात आहे . एप्रिल ते जून या महिन्यात लोकांना करावा लागणारा टँकर ने पाणीपुरवठा यामुळे गावचे ग्रामस्थ त्रस्त होते. सावर्डे गावात पाणीपुराठा मुबलक व्हावा यासाठी ग्रामस्थ प्रयत्नशील होते. यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत सावर्डे खुर्द व कासारवाडी प्रादेशिक नळपाणी योजना व्हावी यासाठी आमदार शेखर निकम यांचेकडे निवेदन दिले.
सावर्डे गावाच्या ग्रामस्थांची सततची मागणी आणि गावाचा पाण्याचा जटील प्रश्न लक्षात घेऊन आमदार शेखर निकम यांनी तत्कालीन सरकारकडे पाठपुरावा करण्यास सुरवात केली मात्र या योजनेसाठी येणारा खर्च हा रु. 5 कोटी पेक्षा जास्त असलेने हा प्रश्न थोडा अडचणींचा बनला होता. मात्र या सर्व अडचणीवर तोडगा काढत त्याचा पाठपुरावा सध्याच्या सरकारकडे आमदार शेखर निकम यांनी चालूच ठेवला. परीणामत: खास बाब म्हणून हिवाळी अधिवेशन दरम्यान सकाराने जलजीवन मिशन अंतर्गत सावर्डे खुर्द व कासारवाडी प्रादेशिक नळ पाणी योजनेस रु. 16,96,06,879/- (सोळा कोटी शहाणव लक्ष सहा हजार आठशे एकोणऐशी) एवढा निधी मंजूर करण्यात आले आहे.
आमदार शेखर निकम यांनी सरकारने जलजीवन मिशन अंतर्गत हा निधी मंजूर केल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, उद्योग मंत्री तथा पालकमंत्री रत्नागिरी उदय सामंत, विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे विशेष आभार मानले आहेत.