(चिपळूण)
प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत मौजे कालुस्ते बु. येथील श्री बाजीबुवा कालेश्वरी मंदिर या पर्यटन स्थळासाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत निधी मंजूर करण्याबाबत आमदार श्री शेखर निकम व कालूस्ते गावातील स्थानिक ग्रामस्थ, मुंबई पुणे ग्रामस्थ यांनी मागणी केली होती. याबाबत पाठपुरव्यानंतर तत्कालीन मंत्री आदित्य ठाकरे, आदिती तटकरे यांच्या प्रयत्नाने सदर काम मार्गी लागले आहे. तसेच मुंबई येथे वास्तव्यास असणारे रमेश कदम यांचे योगदानामुळे हे शक्य झाले आहे.
या कामामुळे येणाऱ्या काळात कालुस्ते गाव पर्यटन क्षेत्र होणार आहे. यामध्ये सभामंडप, कंपाऊंड वॉल, पेवर ब्लॉक, मोरीचे बांधकाम, शौचालय आदी कामे मार्गी लागणार आहेत. या कामाचे भूमिपूजन आमदार शेखर निकम यांचे शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या मिनल काणेकर, माजी पंचायत समिती सदस्य पांडूशेठ माळी व सुनिल तटकरे, कालुस्ते सरपंच रामकृष्ण कदम, कालुस्ते सरपंच दाऊद परकार, भिले सरपंच आदिती गुढेकर, प्रदीप कदम, जमीर पटेल, लतिफ परकार, रामदास कदम, शशिकांत साळवी, आदी मान्यवर उपस्थित होते.