कोविड 19 चा प्रदुभाव रोखण्यासाठी दापोली मतदार संघातील तालुका मंडणगड कुंबळे प्राथमिक आरोग्य केंद्राला आमदार श्री. योगेशदादा कदम यांनी भेट दिली* या भेटीत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आखतीयारात येणाऱ्या गावांची माहिती घेतली *त्यात प्रामुख्याने सध्या स्थितीत किती कोरोना बाधित रुग्ण आहेत. त्यातील किती लक्षणे असणारे आहेत किती लक्षणे नसणारे आहेत. त्यांना कोठे विलगीकरण केले आहे त्यांच्यावर काय उपचार चालू आहेत. दर २ दिवसांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी होम कोरोनटाईंन असलेल्या रुग्णाला तपासायला जातात की नाही यांची माहिती आमदार महोदयांनी घेतली.
तसेच गरोदर मातांना “पंतप्रधान मातृत्व” योजनेतून मिळणाऱ्या लाभार्थी यांना रुपये ५००० ( पाच हजार रुपये ) लाभ मिळतो की नाही तसेच महिन्याला त्यांची तपासणी होते का या सगळ्यांचा आढावा यांनी घेतला. तसेच पंतप्रधान मातृत्व योजना व लसीकरणाबाबत वाडीवस्तीवर जाऊन प्रबोधन करण्याची सुचना केली
तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र कुंबळे येथे covid shild, covaccine अशा लस उपलब्ध होत्या त्यातील प्रामुख्याने किती गावातील लोकांनी या लस घेतल्या गेल्या, किती जणांचे प्रामुख्याने दोन्ही डोस पूर्ण झाले. कोणती औषध उपलब्ध आहेत तसेच लस घ्यायला आलेल्या प्रत्येक नागरिकांची आमदार चौकशी करत होते.लस घेतल्यानंतर बसण्यासाठी कोणते कक्ष आहे की नाही याची माहिती घेतली. तसेच लसीचा साठा उपलब्ध करून देणार असल्याचे, तसेच गरजेनुसार अँटीजन चाचणी तसेच RTPCR चाचणी वाढविणे व प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदांवर नवीन नियुक्ती लवकरात लवकर करुन देण्याबाबत शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचे या भेटी दरम्यान सांगितले.
शिवसेना मंडणगड तालुकाप्रमुख श्री. प्रताप घोसाळकर, शिवसेना विभागप्रमुख श्री. दिपक मालुसरे, मंडणगड ग्राहक संरक्षण कक्ष तालुकाप्रमुख श्री. सुजीत देवकर, महिला आघाडी उपतालुकासंघटीका सौ. समीक्षा लोखंडे, तालुका सचिव श्री. सिद्धेश देशपांडे, कादवण ग्रामपंचायतचे सरपंच श्री. राजेंद्र सोंडकर, युवासेना प्रभारी तालुकाधिकारी श्री. जितेंद्र पाटील, उपतालुकाधिकारी श्री. राकेश गायकवाड, श्री. संदेश लोखंडे, श्री. श्रीरंग राणे, कुंबळे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्री. सुबोध गूळवे, डॉ. श्री. भगवान पितळे, आरोग्य सहाय्यक श्री. राजेश कोळेकर, आरोग्य सेविका सौ. देवकाते, आरोग्य सेविका सौ. शेट्ये, आरोग्य सेवक सेविका उपस्थित होते.