(रत्नागिरी / प्रतिनिधी)
जनता दल युनायटेडच्यावतीने राकेश भानू कांबळे यांना ‘जनसेवक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. कांबळे हे स्वतः दिव्यांग असून देखील सर्वसामान्य नागरिकांना स्वावलंबी बनविण्यासाठी अतिशय तळमळीने कार्य करणाऱ्या राकेश कांबळे यांना आमदार कपिल पाटील यांच्या हस्ते जनसेवक पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
जनता दल युनायटेडच्यावतीने देवरुख येथील माटे-भोजने-खेतल सभागृहामध्ये मंगळवारी ( दिनांक २३ मे २०२३) संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून जनता दल युनायटेडचे राष्ट्रीय महासचिव व आमदार कपिल पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमात प्रस्थापितांची सत्ता, पैसा आणि मुजोरी यांच्या विरोधात ठामपणे लोकहितासाठी आवाज उठवणाऱ्या निस्वार्थी व्यक्तींना “जनसेवक पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले. दिव्यांगांचे प्रश्न शासन दरबारी प्रकर्षाने मांडून दिव्यांग बांधवांच्या उन्नतीसाठी निस्वार्थीपणे काम करीत आहे. तसेच सामाजिक, राजकीय, धार्मिक क्षेत्रात सहभागी होत असतात. एकूणच कांबळे यांच्या उल्लेखनिय कार्याची दखल घेऊन जनता दल युनायटेडचे राष्ट्रीय महासचिव आमदार कपिल पाटील यांच्या हस्ते जनसेवक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून राकेश कांबळे यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.
या कार्यक्रमात कुणबी समाजाचे नेते सुरेश भायजे, तालुका संघटक मोईन साटविलकर, अनिल बांडागळे, विनय खेडेकर, ओबीसी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शरदचंद्र गीते, कोकणचे गाडगेबाबा मारुतीकाका जोशी, सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते, बबन बांडागळे, वैभव कदम, राजन देसाई, वैदेही सावंत, दीपक लिंगायत आदी उपस्थित होते.