सत्ताधारी आमदारांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता आणि बॉडी लँग्वेज पडलेली होती, ही कोणत्या भूकंपाची चिन्हे असावीत, असा सवाल रोहित पवार यांनी केली आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या याचिकांवर गेल्या दोन दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. राज्यातील सत्तासंघर्षाचा पेच अद्यापही सुटलेला नाही. दोन दिवसांच्या सुनावणीतही सर्वोच्च न्यायालयात याबाबत निकाल अद्याप लागलेला नाही. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी हे ट्विट केले आहे. न्यायालयाच्या या घटनाक्रमावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केलेलं ट्वीट चर्चेत आलं आहे.
या आमदारांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता आणि बॉडी लँग्वेज पडलेली होती.. सत्ताधारी असूनही काही आमदारांना मुख्यमंत्र्यांना भेटता येत नसल्याचं समजलं.. शिवाय अर्थ विभागातून विशिष्ट पक्षाच्याच फायली मंजूर होत असून त्याचा वेगही अचानक वाढल्याचं समजलं…
ही कोणत्या भूकंपाची चिन्ह असावीत?— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 15, 2023
रोहित पवार यांनी ट्विट केले आहे की, भूकंपापूर्वी प्राणी आणि पक्षांचे वर्तन बदलत असते. एक प्रकारे ती भूकंपाची पूर्वसूचनाच असते. असेच एक वेगळ्या प्रकारचे माझे निरीक्षण आहे. सत्ताधारी पक्षातील अनेक सहकारी आमदारांची कामानिमित्त मुंबईत असताना भेट झाली असता काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या. या आमदारांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता आणि बॉडी लँग्वेज पडलेली होती. सत्ताधारी असूनही काही आमदारांना मुख्यमंत्र्यांना भेटता येत नसल्याचे समजले. शिवाय अर्थ विभागातून विशिष्ट पक्षाच्याच फायली मंजूर होत असून त्याचा वेगही अचानक वाढल्याचे समजले. ही कोणत्या भूकंपाची चिन्हे असावीत? अशी विचारणा रोहित पवार यांनी केली आहे.