[ संगमेश्वर /प्रतिनिधी ]
तालुक्यातील कडवई येथील भाईशा घोसाळकर हायस्कूल, गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी श्री. मिलिंद कडवईकर सरांनी ‘गुरूंचे महत्व’ या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले की, आपल्या जडणघडणीमध्ये गुरूंचे महत्वाचे स्थान असते. गुरूंनी दिलेल्या ज्ञानाचा आयुष्याच्या प्रवासात उपयोग करून यशस्वी झालो तर देशाला महासत्ता बनायला वेळ लागणार नाही. भारतीय संस्कृतीमध्ये गुरू शिष्यांच्या जोड्या प्रसिद्ध आहे. गुरू या शब्दाचा अर्थ स्पष्ट करताना त्यांनी विविध उदाहरणे देत गुरुंचे महत्व समजावले.
या कार्यक्रमाला मुख्याध्यापक श्री. अवघडे सर, पर्यवेक्षक श्री. साळुंके सर, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री. मिलिंद चव्हाण,सदस्य श्री.अशोक उजगावकर,सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश कुंभार सर यांनी तर आभारप्रदर्शन श्री.भालेकर सर यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभागप्रमुख श्री.किंजळकर सर व श्री. कानाल सर यांनी मेहनत घेतली.