रत्नागिरी : गेले वर्षभर लॉकडाऊन काळात सर्वसामान्य जनता भरडली गेली असतानाच आणि जनतेचे आर्थिक उत्पन्नाची साधनेच बंद असताना कॉन्व्हेंट हायस्कूल आणि रत्नागिरीतील इतर शाळा पालकांना पहिली फी भरा मगच पुढच्या इयत्तीची पुस्तके आणि ऍडमिशन अशी जबरदस्ती करताना दिसत आहेत.
जर उत्पन्नच बंद असेल तर पालक पुर्ण फी कशी भरणार आम्हाला थोडी थोडी फी भरायला तयार आहोत अश्या तक्रारी राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेसकडे आल्या असून उद्याच कॉन्व्हेंट हायस्कूल प्रशासनाला जाऊन राष्ट्रवादी युवक आणि विध्यार्थी काँग्रेस जाब विचारणार आहे.
आणि ज्या ज्या शाळा पालकांवर अशी जबरदस्ती करतील त्या सर्व पालकांना न्याय देण्यासाठी अश्या शाळांना कुलूप लावू अशी आक्रमक भूमिका राष्ट्रवादी युवक आणि विध्यार्थी काँग्रेस ने घेतली असून तसा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सचिव श्री. बंटी सदानंद वणजू यांनी पालकांनावर फी साठी जबरदस्ती करणाऱ्या प्रत्येक शाळेला दिला आहे.