(डिजि टेक)
आधार कार्ड गेल्या काही वर्षांमध्ये भारतीयांसाठी एक महत्वपूर्ण ओळखपत्र बनलं आहे. एयरपोर्ट ते बँक, सिम खरेदी पासून आणि इतर सरकारी, बिगर-सरकारी कामांसाठी सध्या आधार कार्ड आवश्यक आहे. तसेच भारतात बँक खात्याशी आधार कार्ड लिंक केल्यावर ग्राहकांना अनेक सेवा मिळतात. ग्राहक अनेक कामं बँकेच्या रांगेत न लागत करू शकतात. विशेष म्हणजे युजर्स इंटनेट कनेक्शनविना देखील बँकिंग सेवा वापरू शकतात. आता आधारच्या मदतीनं बँक अकाऊंटमधील बॅलेन्स चेक करण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली गेली आहे.
आधार नंबरवरून बँक बँलेस चेक करण्यासाठी पुढील स्टेप फॉलो करा.
जर तुमच्या बँक अकाऊंटशी आधार लिंक असेल तर तुम्ही *99# सर्व्हिसच्या मदतीनं ऑफलाइनच बँक अकाऊंट बॅलेन्स चेक करू शकता.
स्टेप 1 : बँक अकाऊंटशी लिंक असलेल्या मोबाइल नंबरवरून *99# डायल करा.
स्टेप 2 : तुमच्या मोबाइल नंबरवर ‘वेलकम टू *99#’ मेसेज फ्लॅश होईल.
स्टेप 3 : ओकेवर क्लिक केल्यावर फ्लॅश मेसेजमध्ये मेन्यू ओपन होईल. त्यात तुम्हाला तिसऱ्या नंबरवर चेक बॅलेन्सचा ऑप्शन मिळेल.
स्टेप 4 : त्यामुळे बॅलेन्स चेक करण्यासाठी 3 टाइप करून रिप्लाय करा.
स्टेप 5 : थोड्या वेळानं फोनमध्ये फ्लॅश मेसेज येईल ज्यात तुम्हाला यूपीआय पिन रिप्लाय करावा लागेल.
स्टेप 6 : पुढील फ्लॅश मेसेजमध्ये तुम्हाला तुमचा बँक बॅलेन्स समजेल.