(डिजिटल टेक्नॉलॉजी)
आधार कार्ड भारतीय नागरिकांसाठी खूप महत्वाचं ओळखपत्र आहे. आपली अन्य ओळखपत्र असून देखील आधार कार्डला प्राथमिकता दिली जाते. सर्व प्रकारच्या सरकारी व बिगर सरकारी संस्था जसे की शाळा, हॉस्पिटल, बँक व फायनान्स सर्व्हिसेजमध्ये ओळख पटवण्यासाठी आधार कार्डची मागणी केली जाते. परंतु कधीकधी हे आधार कार्ड हरवतं आणि मग मोठी पंचाईत होते. तुम्ही देखील तुमच्या परिवारातील किंवा मित्राचं आधार कार्ड हरवल्याचं किंवा फाटल्याचं ऐकलं असेल. अशाप्रसंगी आधार कार्डची फोटोकॉपी हवी मिळवणं देखील कठीण असतं.
आधार कार्ड खराब झाल्यास आपण त्याचा वापर कुठेही करू शकत नाही आणि किंवा नवीन आधार कार्ड बनवण्यासाठी चकरा मारतो. परंतु आज आम्ही तुम्हाला अशी पद्धत सांगणार आहोत जिच्या माध्यमातून तुम्हाला तुमचं नवीन आधार कार्ड बनवण्यासाठी कुठेही जाण्याची आवश्यकता नाही आणि पैसे खर्च करण्याची देखील गरज नाही. फक्त ऑनलाईन पद्धतीनं आधार कार्डची नवीन कॉपी म्हणजे इलेक्ट्रॉनिक आधार काढता येईल आणि कुठेही अवशक्यतेनुसार आधार कार्ड कॉपीच्या ऐवजी देता येईल. आधार कार्ड खराब झाल्यास किंवा फाटल्यास ही कॉपी प्रत्येक ठिकाणी सहज वापरता येईल.
Aadhar Card Download प्रोसेस
1. सर्वप्रथम आधार कार्डची ऑफिशियल वेबसाइट ओपन करा: uidai.gov.in
2. इथे होम पेजवरच ‘My Aadhaar’ चा ऑप्शन मिळेल, त्यावर क्लिक करा.
3. ‘माय आधार’ सेक्शनमध्ये अनेक पॉईंट्स दिसतील, यातील एक ‘डाउनलोड आधार’ ऑप्शन निवडा आणि क्लिक करा.
4. ‘डाउनलोड आधार’ वर क्लिक करताच नवीन टॅब ओपन होईल, जिथे आधार कार्डची इलेक्ट्रॉनिक कॉपी म्हणजे डिजीटल आधार कार्ड डाउनलोड करण्यास सांगितलं जाईल.
5. इथे आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी तीन ऑप्शन मिळतील, ज्यात Aadhar Number, Enrolment ID (EID) आणि Virtual ID (VID) चा समावेश आहे.
6. तुमच्यकडे जो रेकॉर्ड उपलब्ध असेल त्यानुसार एक निवडा आणि तुमची पसर्नल आयडी सबमिट करा.
7. नंबर टाकल्यानंतर ‘सेंड ओटीपी’ च्या ऑप्शनवर क्लिक करा, आपके आधार कार्डसह जो मोबाइल नंबर लिंक असेल त्यावर वन टाइम पासवर्ड येईल, तो सबमिट करा.
8. वेबसाइटवर देण्यात आलेला सर्वे पूर्ण केल्यानंतर आधार कार्डची इलेक्ट्रॉनिक कॉपी डाउनलोड करण्याचा ऑप्शन येईल.
9. ‘व्हेरिफाय अँड डाउनलोड’ वर क्लिक करा, आधार कार्ड पीडीएफ फॉरमेटमध्ये डाउनलोड होईल.
10. आधार कार्डची ही कॉपी पासवर्ड प्रोटेक्टेड असेल, त्यामुळे जेव्हा तुम्ही ही तुमच्या फोन किंवा लॅपटॉप इत्यादीवर ओपन कराल तेव्हा दरवेळी हा पासवर्ड टाकावा लागेल.