(देवरूख /समीर सप्रे)
मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी या राज्यव्यापी संघटनेच्यावतीने दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श पत्रकार दर्पणरत्न पुरस्कार देवरूखचे जेष्ठ पत्रकार सुरेश सप्रे यांना ज़ाहिर झाला असल्याची माहिती मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी संस्थेचे समन्वयक एल. एस. दाते यांनी दिली.
३५ वर्षांपेक्षा अधिक काळ पत्रकारितेत कार्यरत असणारे सुरेश सप्रे यांची आदर्श पत्रकार दर्पणरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. पत्रकारितेबरोबरच सांस्कृतिक चळवळीतही सप्रे यांचा सहभाग आहे. सुरेश सप्रे यांचा पिंड पत्रकारितेचा… ! गेले सुमारे ३५ वर्ष ते पत्रकारीतेच्या माध्यमातून समाजकार्य हि करतायत .. पत्रकारिता म्हणजे केवळ बातम्या देणे या समजाला छेद देत त्यानी तालुक्याच्या; जिल्ह्याच्या प्रत्येक चांगल्या कामात हिरहिरीने भाग घेतला…. आपल्या ओळखीचा फायदा घेत अनेकांना मदत केली. अनेकजण त्यांचे बोट धरून पत्रकारितेत आले. अशातच त्यांना कर्करोगाने गाठले…. परंतु मुळातच बंडखोर स्वभाव; अफाट जिद्द; प्रचंड इच्छाशक्ती तरीही फणसासारखा वरुन काटेरी आणि आतून रसाळ अशा गुणांवर त्यांनी कर्करोगाच्या राक्षसाला सुद्धा पराभूत केले. त्यांच्याबद्दल लिहायचे झाले तर कदाचित एखादी लेखमाला कमी पडेल.
अतिशयोक्ती वाटेल पण काही लोकाना पुरस्कार दिले की त्या पुरस्काराचे महत्व वाढते…. सुरेश हा त्यापैकीच एक!!! त्याला पुरस्कार देवुन तो देणाऱ्यानी अत्यंत योग्य निवड केली असून सुरेशची पत्रकारिता प्रवास लोकांपर्यंत पोचला तर थक्क करणारा आहेच; परंतु सर्वानाच तो प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही.
श्री सुरेश सप्रे यांचा थोडक्यात जीवनप्रवास
श्री सुरेश सप्रे यांचा जन्म ३० जानेवारी १९६५ रोजी झाला. शाळा आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी १९८७ साली दै. रत्नभूमी मधून पत्रकारितेला सुरुवात केली. १९८८ दै. रत्नागिरी टाइम्स या अग्रगण्य वृत्तपत्राचे देवरुख प्रतिनिधी म्हणून नेमणूक. २००३ साली दै रत्नागिरी टाईम्स च्या संगमेश्वर तालुका प्रतिनिधीपदी नियुक्ती. आजतागायत तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. पत्रकारीतेबरोबरच तालुक्याच्या आणि विशेषतः देवरुखच्या प्रत्येक सांस्कृतिक; सामाजिक चळवळीत सहभाग. राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा; आकार ऑर्गनायझेशनच्या स्थापनेत पुढाकार; खाद्य महोत्सव; नाट्य महोत्सव; रक्तदान शिबिरे; आरोग्य तपासणी शिबिरे; होतकरू विद्यार्थ्यांना मदत; क्रिडा महोत्सव आदी उपक्रमात तालुका पत्रकार संघ आणि व्यक्तिगत पातळीवर सक्रिय सहभाग! संगमेश्वर तालुका पत्रकार संघाचे काही काळ अध्यक्षपदाची जबाबदारी. सध्या रत्नागिरी जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत.
पत्रकारीता करताना निस्पृहपणे परखड लिखाण कसे करावे याचे मार्दशन त्यांना दै. सागरचे संपादक कै. नाना जोशी. दै. रत्नागिरी टाइम्स चे सर्वेसर्वा संपादक उल्हास घोसाळकर व कै. प्रकाश भाबल यांनी पत्रकारीता करताना निस्पृहपणे परखड लिखाण कसे करावे याचे धडे दिल्याने मी पत्रकारीतेत यशस्वी झाल्याचे ते आर्जवून सांगतात.
सदरचा पुरस्कार वितरण समारंभ २ आक्टोबरला मुंबई संपन्न घेणार आहे आदर्श पत्रकार म्हणून दर्पणरत्न पुरस्कार मराठी पत्रकार परिषदचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश सप्रे यांना पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांच्यावर राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.