लाळेच्या चाचणीतून आता महिला गर्भवती आहे की नाही, हे तपासता येणार आहे. जगात प्रथमच इंग्लंडमध्ये अशा प्रकारची चाचणी करण्यात आली. यापूर्वी पारंपरिक पद्धतीने महिलांना गर्भवती असल्याचे कळत होते. मात्र, आता आधुनिक तंत्रज्ञाच्या मदतीने ही गोष्ट आणखी सोपी झाली आहे. हे विशेष गर्भ चाचणी किट अमेरिका आणि आयर्लंडच्या बाजारपेठांमध्ये लॉन्च करण्यात आले आहे.
हे किट इस्रायलमधील सॅलिग्नॉस्टिक या बायोटेक कंपनीने तयार केले आहे. ‘सॅलिस्टिक’ असे या उत्पादनाचे नाव आहे. मागील वर्षी या विशेष किटची ३०० महिलांवर यशस्वी चाचणी करण्यात आली. या चाचणीमध्ये गर्भवती आणि सामान्य महिलांचा समावेश होता. सॅलिस्टिकमुळे महिलांना गर्भ चाचणीसाठी एक नवा उत्तम पर्याय उपलब्ध झाला आहे. हे किट तयार करणाऱ्या कंपनीने यापूर्वी कोरोना चाचणी किट बनवले आहेत.
यापुर्वी युरिन टेस्टमधून महिलांना ही ‘गुड न्यूज’ कळत होती, आता मात्र लाळेच्या चाचणीतूनही ती कळू शकणार आहे. हे विशेष प्रेग्नेंसी किट यूके आणि आयर्लंडच्या बाजारपेठांमध्ये लॉन्च करण्यात आले आहे.