गेल्या महिनाभरापासून राज्यात सुरु असलेल्या लॉकडाऊनविरोधातआता व्यापारी समाज आक्रमक होण्याची शक्यता आहे. गेल्या ४० दिवसांपासून दुकाने बंद आहेत. यामध्ये व्यापाऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता ठाकरे सरकारने काहीही करून महाराष्ट्र अनलॉक केलाच पाहिजे, अशी मागणी फेडरेशन ऑफ रिटेल वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष विरेन शहा यांनी केली आहे
ते बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी आता कोणत्याही परिस्थितीत राज्यातील दुकाने उघडण्यास ठाकरे सरकारने परवानगी दिलीच पाहिजे, असे सांगितले.