देशातील कोरोनाचे वाढते संक्रमण रोखण्यासाठी, आता आणखी एक व्हॅक्सीन भारतात आली आहे. आतापर्यंत 18 वर्षापेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींना कोवॅक्सीन आणि कोविशील्ड लस दिली जात आहे. रशियाची व्हॅक्सीन स्पुतनिक- व्ही आता बुकींगसाठी कोविन ॲपवर उपलब्ध झाली आहे.
डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजने अपोलो हॉस्पिटल सोबत स्पुतनिक- व्ही व्हॅक्सीनसाठी करार केला आहे. स्पुतनिक व्हीची लस हैदराबादच्या जुबली हिल्समधील अपोलो रुग्णालयात दिली जात आहे. यानंतर विशाखापट्टनम, दिल्ली, मुंबई, बंगळुरु, अहमदाबाद, चेन्नई, कोलकाता आणि पुण्यात देखील रशियाची ही व्हॅक्सीन उपल्बध होणार आहे. अपोलो हॉस्पिटल मध्ये स्पुतनिक-व्ही चा एका डोससाठी 1250 रुपये मोजावे लागणार आहे. ज्यामध्ये रुग्णालयाचे चार्जेस देखील समाविष्ट आहेत. स्पुतनिक व्हीची किंमत 948 रुपये आहे. ज्यावर 5 टक्के जीएसटी लागत आहे. ज्यामुळे वॅक्सीनची किंमत 995.4 रुपये होते. यामध्ये हॉस्पिटलचे चार्जेस जोडून त्याच्या एका डोसची किंमत 1250 रुपये आहे, अशी माहिती डॉ रेड्डीज लॅबोरेटरीजने दिली होती. रशियाची स्पुतनिक-व्ही वॅक्सीनची पहिली खेप 1 मे रोजी भारतात आली होती. यानंतर डॉ. रेड्डीज लॅबने वॅक्सीनची किंमत जाहीर केली. 13 मेला सेंट्रल ड्रग्स रेगुलेटरी याला मंजुरी देण्यात आली आहे.