(मुंबई)
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा भाजपावर हल्लाबोल केला आहे. मुंबईतील काळाचौकी येथे शिवसेना शाखेचं उद्घाटन पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी भाजपाचा चांगलाच समाचार घेतला. भाजपाला मुंबई पालिकेवर स्वत:चा ठसा उमटावायचा आहे, यासाठी हा भाजपाच हा डाव आहे. ठाकरे व शिवसेना हे नातं घट्ट आहे, दरम्यान, एकही सच्चा शिवसैनिक बंडखोरांबरोबर गेलेला नाही असं सुद्धा उद्धव ठाकरे म्हणाले. बंडखोरांना केंद्राच्या सुरक्षेमध्ये फिरावे लागत आहे. यावरुन त्यांची अवस्था समजू शकते. पुढे बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, बंडखोरांनी आपआपल्या वडिलांच्या नावाने मते मागावी, माझ्या वडीलांच्या नावे मते मागू नये अशी टिका बंडखोरांवर सुद्धा केली.
दरम्यान, भाजपाला शिवसेना संपवायची आहे, मी सुद्धा महाराष्ट्र दौरा करणार आहे. माझा वाढदिवस साजरा करुन काय होणार आहे? मला वाढदिवशी शुभेच्छा, पुष्पगुच्छ, नकोत, तर या दिवशी मला भेट द्याची असेल तर, शिवसैनिकांचे एकनिष्ठेचे प्रतिज्ञापत्र गठेच्या गठ्ठे हवे आहेत. हिच मला वाढदिवसाची भेट द्या असं सुद्धा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी म्हटलं. मी गणपतीकडे साकडं घालतो की, जे आरिष्ट आलं आहे, हे संकट आलं आहे, ते दूर होवो, व पहिल्यापेक्षा अधिक जोमाने भगवा संपूर्ण हिंदुस्थानात फडको, असं सुद्धा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी म्हणत भाजपा व बंडखोरांवर घणाघात केला.
आमची हिंदुत्वाची व्याख्या खूप सोपी आहे. आमचे हिंदुत्व हे समाजासाठी देशासाठी आहे, तर भाजपा हे राजकारणासाठी हिंदुत्त्वाचा वापर करत आहे, अशी बोचरी टिका ठाकरेंनी केली. मराठी माणसाला संपविण्याचा भाजपाचा डाव आहे, ही लढाई पैसा विरुदध निष्ठा अशी आहे, बंडखोर पक्ष नव्हे तर माझे वडील सुद्धा चोरायला निघालेत असं सुद्धा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपा व बंडखोरांवर हल्लाबोल केला. मुंबईत काळाचौकी येथे शिवसेना शाखेचं उद्घाटन पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी भाजपाचा चांगलाच समाचार घेतला.