(सुरेश सप्रे/देवरूख)
शैक्षणिक तसेच सहशैक्षणिक यशामध्ये सातत्य राखण्यासाठी सतत वाचन, मनन, चिंतनाबरोबर सातत्याने सरावाची गरज असल्याचे मत संस्थाध्यक्ष सदानंद भागवत यांनी केले. तसेच अभ्यासाबरोबर सुदृढ व उत्तम आरोग्यासाठी दैनंदिन व्यायामाचे महत्व स्पष्ट करून. स्वतःच्या प्रगतीबरोबर कुटुंब, समाज आणि राष्ट्राच्या प्रगतीचा सतत ध्यास घेण्याचे आवाहन ही भागवत यांनी केले.
देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता अकरावी परीक्षेतील यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारचे आयोजन महाविद्यालयाच्यावतीने नुकतेच करण्यात आले होते. या कार्यक्रमात इयत्ता अकरावीच्या कला, वाणिज्य आणि एम.सी.व्ही.सी. शाखेतील विविध वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानीत करण्यात आले. या गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये चैतन्या तेंडोलकर, रुत्वी जाधव, सलोनी करंबेळे, अक्षता भाट्ये, साक्षी पेंढारकर, किरण टक्के, साक्षी अणेराव, तृप्ती सागवेकर, अश्विनी गावडे, अक्षता गुडेकर, सानिका पातेरे, सिद्धी संसारे, दीप्ती करंबेळे, सुशांत शेळके, साक्षी मांगले आणि साक्षी कुंभार आदींचा समावेश होता.
गुणवंत विद्यार्थ्यांना संस्थाध्यक्ष सदानंद भागवत,वेदा प्रभुदेसाई व इतर मान्यवरांचे हस्ते सन्मानित करणेत आले.
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे कनिष्ठ महाविद्यालय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा ॲड. वेदा प्रभुदेसाई, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.