( संगमेश्वर/ प्रतिनिधी )
देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये- सप्रे- पित्रे कनिष्ठ महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागामार्फत पारंपारिक समूह नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. एम. आर. लुंगसे यांनी सरस्वती पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. उपप्राचार्य डॉ.पाटील यांनी सहभागी स्पर्धकांना शुभेच्छा देताना पारंपारिक वारसा जपण्यासाठी आपण असे पारंपारिक कार्यक्रम नियमित आयोजित केले पाहिजे असे सांगितले त्याचबरोबर विद्यार्थी स्पर्धकांचे कौतुकही केले.
कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी मंगळागौरीचे खेळ साजरे केले, यामध्ये स्त्रियांच्या सामाजिक स्थानावरही प्रकाश टाकला. भारत मातेला वंदन आणि भारत मातेची महती गीत व नृत्यातून सादर केली. प्रत्येक स्त्रीच्या जबाबदाऱ्या व कार्यकर्तुत्त्वाचा आदर अभिनय, गीत व नाट्यातून विद्यार्थिनींनी सादर केला.
या स्पर्धेतील यशस्वी गट पुढील प्रमाणे
प्रथम क्रमांक सई नर आणि सहकारी (११वी वाणिज्य), द्वितीय क्रमांक (विभागून)-* गायत्री रामाणे आणि सहकारी (१२वी संयुक्त) आणि आकांक्षा गावडे आणि सहकारी (१२वी वाणिज्य), तृतीय क्रमांक पायल कासेकर आणि सहकारी (१२वी एम.सी.व्ही.सी.), उत्तेजनार्थ (विभागून) सानिका मेस्त्री आणि सहकारी (१२वी वाणिज्य-ब) व दिक्षा ढवळ आणि सहकारी (११वी संयुक्त ) यांनी प्राप्त केला.
या स्पर्धेचे परीक्षण प्रा. सुवर्णा साळवी व प्रा. सानिका भालेकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. सीमा कोरे यांनी केले, तर आभार प्रा. स्वप्नाली झेपले यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. सीमा कोरे, प्रा. स्वप्नाली झेपले, प्रा.संचिता चाळके, प्रा. सीमा शेट्ये, प्रा. देवयानी जोशी, प्रा. गायत्री जोशी, प्रा. मधुरा मांगले, प्रा.संदीप मुळ्ये, प्रा. शिवराज कांबळे, प्रा.सुनील वैद्य यांनी मेहनत घेतली.