(रत्नागिरी/प्रतिनिधी)
मोनिका नातूज चित्रांगण, मुंबई निर्मित आणि साक्षी क्रिएशन चिपळूण प्रकाशित आज्जू – एक हृदयस्पर्शी कथा या लघुपटाचे पोस्टर रिलीज परमपूज्य श्री श्री रविशंकर जी यांच्या हस्ते, बँगलोर येथे पार पडले.
या लघुपटाचे दिग्दर्शन मनोज नार्वेकर यांनी केले असून कथा, पटकथा व संवाद नंदा आचरेकर यांनी लिहिले आहेत. लघुपटाचे निर्माते श्री. विलास पाटील असून अड. सौ. जया उदय सामंत यांचे विशेष सहकार्य या लघुपटाला लाभले आहे.
आज्जू या लघुपटाला तब्बल 25 विविध फिल्म फेस्टिवलमध्ये उत्कृष्ट बालकलाकार म्हणून प्रथम पदार्पण बालकलाकार- कु. किर्ती उदय सामंत हिला पारितोषिके मिळाली आहेत व रत्नागिरीच्या या कन्येचे सर्वत्र भरभरून कौतुक होत आहे. दिनांक 27 एप्रिल रोजी आयोजित केलेल्या आज्जू या लघुपटाच्या स्क्रीनिंगला रत्नागिरीकरांचा भरभरून प्रतिसाद लाभला.
सुरेश गुंदेजा, मोनिका जैस्वाल मॅडम, स्मिता परांजपे, श्री. नंदा आचरेकर, श्री विलास पाटील, बालकलाकार आर्यन पाटील, श्री पराग शेटे, श्री. धर्मसिंह चौहान, श्री. सुधाकर सावंत व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत सिटीप्राईड मल्टिप्लेक्स रिलायन्स मॉल रत्नागिरी येथे आज्जु चे स्क्रीनिंग पार पडले. लवकरच हा लघुपट Youtube द्वारे प्रकाशित होणार असून, त्याचा आनंद प्रेक्षकांना घेता येईल.