(रत्नागिरी / प्रतिनिधी)
आजारपणाला कंटाळून वृद्धाने चिरेखाणीत आत्महत्या केल्याची घटना रत्नागिरी तालुक्यातील कोळंबे येथे घडली आहे. शिवाजी भिकाजी साळवी (64, कोळंबे रत्नागिरी) असे आत्महत्या केलेल्या वृद्धाचे नाव आहे. ही घटना रविवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी साळवी हे मागील काही वर्षापासून अर्धांगवायूच्या आजारपणाला कंटाळले होते. याच कारणातून रविवार 1 जानेवारी रोजी दुपारी साळवी यांनी कोळंबे येथील मराठी शाळेजवळ असलेल्या चिरेखाणीमध्ये आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी शिवाजी यांनी घरामध्ये चिठ्ठी लिहून ठेवली होती, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. यामध्ये त्यांनी आजारपणाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आह़े.