(मुंबई)
महागाईने बेजार झालेल्या सामान्य जनतेला आणखी एक झटका बसणार आहे. केंद्र सरकारनं नैसर्गिक गॅसची किंमत तब्बल ४० टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला गेला आहे. आजपासून सर्वसामान्य जनतेला या नव्या महागाईचा सामना करावा लागणार आहे. यामुळे देशातील वीज उत्पादन, इंधन आणि वाहन चालवण्यासाठी वापरण्यात येणारी गॅस महाग होण्याची शक्यता आहे.
नैसर्गिक गॅसची किमत ६.१ डॉलर प्रति एमएमबीटीयू वरुन ८.५७ डॉलर प्रति एमएमबीटीयू करण्यात आली आहे. नवीन दर आजपासून म्हणजे एक ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत. नैसर्गिक वायु वीज उत्पादनासाठी एक प्रमुख कच्चा माल आहे. याला सीएनजीमध्ये परिवर्तीत केले जाते आणि पाइप्ड नॅचुरल गॅस (पीएनजी) म्हणजे घरगुती गॅसच्या रुपात वापर केला जातो.
नैगर्गिक गॅसच्या दरात वृद्धी झाल्याने सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. ज्या मागील एक वर्षात ७० टक्क्यांनी वाढले आहेत. गॅसचे दर महागाई अजून वाढवण्याची शक्यता आहे. महागाईचा दर मागील आठ महिन्यात उच्च पातळीवर आहेत. महागाई कमी करण्यासाठी आरबीआयकडून सतत रेपो रेटमध्ये वृद्धी केली जात आहे. घरगुती गॅसच्या दराबरोबर आता वाहतुकीच्या खर्चात देखील वाढ होणार आहे. रशिया – युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात नैसर्गिक गॅसच्या किंमतीत वाढल्या आहेत.