(राजापूर)
रत्नागिरी जिल्ह्यातील होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कॉर्नर सभा राष्ट्रवादी काँग्रेसचे राजापूर तालुका अध्यक्ष आबा आडीवरेकर यांच्या उपस्थितीत शनिवारी पाचल येथे संपन्न झाली.
यावेळी आबा आडीवरेकर यांनी सभेत आपलं मतं व्यक्त करताना, आपल्या पक्षाचं पॅनल तयार ठेवायला हवं आणि जरी पॅनल तयारीत असलं तरी पहिलं प्राधान्य आपण महाविकास आघाडीला द्यायला हवं असं ते यावेळी स्पष्टपणे बोलून गेले, पुढे बोलताना ते महाविकास आघाडीने आपल्याला स्वीकारलं नाही तर आपला पक्ष स्थानिक ठिकाणी जरी कमी असला तरी निर्णायक भूमिका घ्यायला सक्षम असल्याचं स्पष्टीकरण देखील यावेळी त्यांनी दिलं. मात्र तालुका अध्यक्ष यांनी दिलेल्या या स्टेटमेंटला झिडकारून राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्वाने मात्र हम बोलें सो कायदा अशी भूमिका घेतल्याने काही गोष्टी स्पष्ट न झाल्याचं चित्र पाहायला मिळालं.
संपूर्ण राजापूर तालुक्याचे लक्ष वेधून घेतलेल्या पाचल ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवार दिनांक 12 नोव्हेंबर रोजी पाचल येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राजापूर तालुका अध्यक्ष आबा आडीवरेकर यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पाचल विभागाची कॉर्नर सभा काल पाचल येथे आयोजित करण्यात आली होती.
या सभेला जिल्हा सरचिटणीस अण्णा पाथरे, तालुका सरचिटणीस सुनील जाधव, राष्ट्रवादीच्या मा.महिला जिल्हाध्यक्ष धनश्री मोरे, पाचल गावच्या माजी सरपंच अपेक्षा मासये, येरडव गावचे युवा नेते उमेश दळवी, सुभाष नारकर, वसंत चव्हाण, विजय लांजेकर, चंद्रकांत चव्हाण, तळवडे गावचे युवा नेतृत्व अमित चिले, खाशाबा सागरे, स्मिता सागरे उपस्थित होते.