(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुका हा शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत गद्दारांना गाडल्याशिवाय शांत बसायचे नाही, असा निर्धार शिवसैनिकांनी कोतवडे विभागाच्या प्रमुख पदाधिकारी मेळाव्यात केला आहे. शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या रत्नागिरी तालुक्यात विभागनिहाय बैठका होत असून कोतवडे विभागाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा नुकताच कोतवडे येथील घैसास सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी व्यासपीठावर जिल्हा समन्वयक संजय पुनसकर,तालुकाप्रमुख प्रदीप तथा बंड्या साळवी,माजी उपजिल्हाप्रमुख राजेंद्र शिंदे, माजी शहरप्रमुख तथा विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रमोद शेरे,उपतालुकाप्रमुख प्रकाश जाधव, उपजिल्हाप्रमुख सुजीत कीर व संजय साळवी,कोतवडे विभागप्रमुख उत्तम मोरे आदींसह अन्य पदाधिकारी व कोतवडे जिल्हा परिषद गटातील विविध ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच व सदस्य आणि सर्व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याच मेळाव्यात कोतवडे युवासेनेमार्फत विविध पदाधिकारी नेमणुका करण्यात आल्या.यावेळी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन युवा वर्गाचा कल वाढत असल्याचे सांगण्यात आले.यावेळी युवासेनेचे जिल्हा समन्वयक दुर्गेश साळवी, युवासेना तालुकाप्रमुख प्रसाद सावंत, युवासेना तालुका समन्वयक साईनाथ जाधव,उपतालुकाप्रमुख रोहित साळवी, कोतवडे विभागप्रमुख गजानन गिडये,उप विभागप्रमुख स्वप्नील शिंदे आदींसह युवासेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
या मेळाव्यात उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना महाविकास आघाडीच्या सरकारने केलेल्या विकासकामांची माहिती देण्यात आली. तसेच कोरोना काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची माहिती देऊन आगामी निवडणुकीत गद्दारांना गाडल्याशिवाय शांत बसायचे नाही. तसेच सर्वांनी एकसंध होऊन काम करावे, असे आवाहन केले.शेवटी उपस्थित सर्वच शिवसैनिक व युवासेनेकडून आगामी निवडणुकीत गद्दारांना गाडण्याचा एकच निर्धार करण्यात आला.