(जाकादेवी / संतोष पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मौजे आगरनरळ येथील श्री.ग्रामदेवता शिमगोत्सव मोठ्या भक्तीभावनेने आनंदाच्या व उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.
ग्रामदेवता शिमगा उत्सवासाठी आलेल्या सर्व भाविकांसाठी आगरनरळ देऊळवाडी यांच्यातर्फे मोफत सरबत आणि गोड लाडू प्रसाद म्हणून वाटप करण्यात आले.या कार्यक्रमासाठी गावच्या उपक्रमशील व धडाडीच्या सरपंच सो.अनुष्का खेडेकर, पंचक्रोशीतील युवा नेतृत्व पंचायत समिती सदस्य, युवा नेते श्री.अभय खेडेकर, उपसरपंच अशोक गोताड,आगरनरळ विकास सोसायटीचे चेअरमन श्री.वासुदेव गोताड, गावच्या देवस्थानचे प्रमुख मानकरी आणि गावकर श्री. तेरेदेसाई, श्री.महाकाळ, लवंदे, ठोंबरे, गोताड, माटल, आगरनरळ कुणबी विकास प्रतिष्ठान लोकपंच कमिटी अध्यक्ष व तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष श्री.विजय गोताड, उपाध्यक्ष संतोष गोताड,पांडुरंग गोताड तसेच मंडळाचे सर्व सदस्य व गावातील तमाम ग्रामस्थ यांनी विशेष मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी पार पाडला.
ग्रामस्थांच्या सेवाभावी उपक्रमांचे तमाम भाविकांनी कौतुक करत हा शिमगोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला.