( चिपळूण )
रत्नागिरी जिल्ह्यात आखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना स्थापन झाल्याबरोबर उर्दू शाळा आणि उर्दू शिक्षकांच्या समस्या मांडण्यासाठी कामाला लागली आहे . उर्दू भाषिक शाळा आणि शिक्षकांवर अन्याय होऊ नये म्हणून या शिक्षक संघाने प्रथमच चिपळूण तालुक्यातील गट शिक्षणाधिकारी दादासाहेब इरनाक यांची भेट घेतली.
आखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाच्या वतीने चिपळूण तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी यांचा यथोचित सम्मान करून आखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाची दिनदर्शिका भेट म्हणून देण्यात आली. त्यानंतर तालुका अध्यक्ष अन्वर कुरवले आणि सचिव फय्याज सुर्वे यांनी उर्दू शाळा आणि उर्दू शिक्षकांच्या समस्या सविस्तरपणे मांडल्या. यावेळी गटशिक्षणाधिकारी चिपळूण यांनी आपण स्वतः लक्ष देऊन या समस्या तातडीने सोडवू, असे आश्वासन दिले.
या भेटीसाठी चिपळूण तालुका अध्यक्ष अन्वर कुरवले, सचिव फय्याज सुर्वे, तालुका खजिनदार अब्दुस् समद पटेल, जिल्हा खजिनदार शौकत कारविणकर आणि राज्य उपाध्यक्ष जियाऊल्लाह खान हे मान्यवर उपस्थित होते. गटशिक्षणाधिकारी यांनी सकारात्मक चर्चा केल्याबाबत तालुका अध्यक्ष अन्वर कुरवले यांनी आभार मानले.