(रत्नागिरी)
समाज माध्यमावर आक्षेपार्ह मजकूर टाकल्याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी शहरातील क्रांतीनगर येथील एका २२ वर्षीय तरुणाला मंगळवारी अटक केली. त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
याबाबत चंद्रकांत श्रीधर राऊत (रा. खेडशी, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस स्थानकात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, चौघांनी आक्षेपार्ह मजकूर टाकला होता. शहर पोलिसांनी चौघांवर भारतीय दंडविधान कायदा कलम १५३ अ, ५०५ (२) २९५ (अ) नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला मंगळवारी रात्री अटक केली. बुधवारी न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक आकाश साळुंखे करत आहेत.