(राजापूर)
राम मंदिर प्राणप्रतिष्ठादिनी समाज माध्यमावर आक्षेपार्ह पोष्ट केल्याबद्दल साखरीनाटे येथील सहा जणांवर राजापूर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एका अल्पवयीन संशयिताला अटक करण्यात आली आहे.
ही पोस्ट जातीधर्मामध्ये तेढ निर्माण करणारी असून, सोमवार दिनांक २२ जानेवारी रोजी रात्री ९ वाजण्याच्या दरम्यान करण्यात आली आहे. राजापूरमधील काही जागरूक तरुणांच्या ते लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिस स्थानकात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. त्यानुसार, राजापूर पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी एका अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आले असल्याची माहिती राजापूरचे प्रभारी पोलिस उपनिरीक्षक अविनाश केदारी यांनी दिली. सर्व आरोपींना अटक व्हावी, या मागणीसाठी सायंकाळी मोठा जमाव पोलिस स्थानकात जमला. पोलिसांनी नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे.