(चिपळूण)
एका हाताने अपंग असतानाही चिमुकल्यांना क्रिकेटचे धडे देणाऱ्या खेर्डी येथील तरूण आकाश पवार याला महाराष्ट्र जर्नालिस्ट फाऊंडेशनचा आदर्श शौर्य भूषण गौरव पुरस्कार देऊन नुकतेच गौरवण्यात आले.
आकाश हा क्रिकेटपट्टू असून काही वर्षापूर्वी झालेल्या अपघातात त्याला एक हात गमवावा लागला. मात्र तरीही त्याने जिद्द न सोडता क्रिकेट अकादमी सुरू करत येथील चिमुकल्यांना क्रिकटचे धडे देत चांगले खेळाडू घडवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे त्याला वरील पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्याने वडील प्रकाश पवार, आई सुनिता पवार, संदेश पवार, सोनल पवार यांच्यासह हा पुरस्कार स्वीकारला.
यावेळी आमदार भरत गोगावले, तासगावकर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स कर्जतचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार तासगावकर, सातारा डीसीसी बँकचे कार्यकारी संचालक डॉ. राजेंद्र सरकाळे, गिरीस्थान महाबळेश्वर नगर परिषद ‘साताराचे मुख्याधिकारी योगेश पाटील, महाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे, शिवसेनेचे प्रवक्ते नितीन पावले, पत्रकार दिलीप देवळेकर, सामाजिक कार्यकर्ते महेंद्र गुजर, निता शेठ, सेंट झेविअर्स स्कूल शिरगावे महाडचे संस्थापक चेअरमन जॉन्सन डिसोझा, उद्योजक प्रशांत गुजर, सतीश वैरागी उपस्थित होते.