(रत्नागिरी)
माहेर संस्थेतील वृध्दाचा आकडी येउन मृत्यू झाला. याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ही घटना सोमवार दि. ५ जून रोजी रात्री ११.३० वा. घडली.
सुधाकर धोंडू भोसले (६८,रा. माहेर संस्था खेडशी, रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या वृध्दाचे नाव आहे. सुधाकर भोसले यांना आकडी येण्याचा आजार होता. त्या आजारावर त्याच्यावर जिल्हा शासकिय रुग्णालयात उपचार सुरु होते. सोमवारी रात्री ११.३० वा. त्यांना आकडी आल्याने जिल्हा शासकीय रुग्णालयातील वैद्यकिय अधिकार्यांनी सुधाकर भोसले यांना तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.