(पाचल /वार्ताहर)
लांजा तालुक्यातील वाघणगाव येथील चार वर्षांपूर्वी घर सोडून पुणे येथे गेलेल्या, आईचा शोध घेण्यासाठी निघालेल्या मुली लांजा पोलिसांच्या ताब्यात मिळाल्या. पोलिसांनी वडिलांशी संपर्क साधून मुली त्यांच्या ताब्यात सुखरुप दिल्या.
आज रोजी वाघण ता.लांजा येथील राहणारी वय-15 व वय-13 वर्ष ही दोन मुले आज 17 एप्रिल रोजी संध्याकाळी एस.टी.डेपो समोर एका बाजुस बसलेल्या आढळुन आली. त्यांना दामिनी पथक मपोहवा/1311 चव्हाण मपोकाँ/742 स्वामी यांनी विचारणा केली असता, त्यांनी आपले आई चार वर्षापुर्वी घर सोडुन गेलेले आहेत व सध्या ती पुणे येथे असुन आम्हाला तिची आठवण येत असल्याने आपण तिच्याशी संपर्क करुन पुणे येथे जात आहोत, असे सांगितले. त्यांचेकडे त्यांच्या वडीलांचे नाव विचारले असता मुलांनी आपल्या वडीलांचे नाव महेंद्र जाधव ता.लांजा असे असुन ते कोकण रेल्वेत कामाला आहेत असे सांगितले. त्यांना फोनवर संपर्क करुन बोलावुन घेवुन दामिनी पथक मुलांना वडीलांसह घेवुन राजापूर पोलीस ठाणेत घेवुन आले यावेळी पोलीस निरिक्षक श्री परबकर राजापूर पोलीस यांनी मुलांना व वडीलांना समजावुन सांगुन मुलांचे मन परिवर्तन करुन दोन्ही मुलांना सुरक्षतेकरिता त्यांचे वडील महेंद्र जाधव लांजा व चुलते यांचे ताब्यात देवुन त्यांना मुलांचे योग्य प्रकारे पालन पोषण करुन सांभाळ करणेबाबात मार्गदर्शन करण्यात आले. या सविस्तर विषयामध्ये पोलीस निरक्षक जनार्धन परबकर, पोलीस उपनिरीक्षक श्री शेख, सह गोपनीय विभागाचे सचिन वीर, हर्षदा चव्हाण, सुषमा स्वामी यांनी मोलाची भूमिका बजावली.