(सिंधुदुर्ग)
गोव्यातील तरूणी कामाक्षी उड्डापनोवा (वय ३०) हिचा प्रियकराने पर्वरीतील एका फ्लॅटमध्ये खून करुन मृतदेह दरीत फेकून दिल्याची घटना घडली. ही घटना ३० ऑगस्ट रोजी घडली होती. मात्र, मृत तरूणी कामाक्षी हिच्या नातेवाईकांनी ती बेपत्ता असल्याची तसेच संशयित म्हणून प्रियकराचे नाव दिल्याने सदर घटना उघडकीस आली. त्यानंतर आज (दि. १ सप्टेंबर) पर्वरी पोलिसांनी संशयित आरोपी प्रियकराला सोबत आणून आंबोली घाटात मृतदेह टाकलेल्या ठिकाणचा शोध घेतला. त्यानंतर कामाक्षीचा मृतदेह ५० फुट दरीतून हस्तगत केला. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी प्रियकर प्रकाश चुंचवाड (वय २२) तसेच अन्य एक साथीदार निरूपदी कड (वय २२) यांना पोलिसांनी अटक केली.
पर्वरीत गॅरेज चालवणारा प्रकाश चुंचवाड (२२) याचे कामाक्षी उड्डापनोवा (३०) नामक तरुणीवर प्रेम जडले होते. कालांतराने त्यांच्यात वाद होऊ लागल्याने कामाक्षीने प्रेम प्रकरण पुढे चालू ठेवण्यास नकार दिला. मात्र, प्रकाशला ही गोष्ट रुचली नाही. तो तिला सतावू लागला. एका फ्लॅटमध्ये त्याने तिची हत्या केली आणि तिचा मृतदेह आंबोली घाटात (सिंधुदुर्ग) नेऊन फेकला. शुक्रवारी पर्वरी पोलिसांनी प्रियकराला सोबत नेऊन आंबोली घाटात शोध घेतला आणि मृतदेह हस्तगत केला.
मंगळवार, २९ ऑगस्ट रोजी मध्यरात्री प्रकाशला समज देण्यासाठी कामाक्षीने म्हापसा येथे बोलवले होते. तिथे त्यांच्यात भांडण झाले, सोबत कामाक्षीचा मित्र आणि मैत्रीण होते. प्रकाशने कामाक्षीच्या कानफटात मारले. यावेळी त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर तिघांनी मिळून प्रकाशचा आयफोन मोबाईल फोडला. नंतर कामाक्षीने म्हापसा पोलीस स्थानकात प्रकाशच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेऊन पोलिसांनी दोघांना बोलावून कडक शब्दांत समज दिली होती. त्याच्याकडून लेखी हमी घेतली. त्यानंतर प्रकाशला सोडून दिले. तेव्हापासून ती तरुणी गायब होती.
कामाक्षीच्या भावाने ३० ऑगस्ट रोजी पर्वरी पोलिसांत ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दोन दिवस तपास करत आहेत. दरम्यान, गुरुवारी रात्री पोलिसांनी प्रकाशला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर त्याने खुनाची कबुली दिली.
आंबोली घाटात ३० फूट खोल दरीत सापडला मृतदेह
‘मी कामाक्षीचा फ्लॅटवर खून करून आंबोली घाटात नेऊन जमिनीत गाडला. तिने माझ्याशी प्रेमसंबंध तोडून दुसऱ्याशी सूत जुळवले होते म्हणून हे कृत्य केले’, असे त्याने पोलिसांना सांगितले आहे. अधिक तपास करण्यासाठी पोलीस फॉरेन्सिक टीमसोबत संशयिताला घेऊन सायंकाळी आंबोली घाटात गेले. तेथे तरुणीचा मृतदेह सापडला. मुख्य रस्त्यापासून २५ ते ३० फुट खोल तिचा मृतदेह सापडला.