२४ न्यूज l संगमेश्वर I २९ ऑक्टोबर २१
🟧 संगमेश्वरमधील शास्त्रीपूल जवळील आंबेडखुर्द येथे साडे बहात्तर खेड्यातील कुणबी भवनाचा पायाभरणी सोहळा आज पार पडला. यावेळी अनेक दिगग्ज नेत्यांनी उपस्थिती लावली होती.
🟧 या कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री अनिल परब म्हणाले, कुणबी भवनासाठी 60 लाखाचा निधी देणार आहे. पण कुणबी भवन नुसतं उभं राहून चालणार नाही तर या समाजाचे आय ए एस, अधिकारी झाले तर या कुणबी भावनाचा खऱ्या अर्थाने उद्देश साध्य झाला असे म्हणावे लागेल. 2022 पर्यत हे कुणबी भवन होण्यासाठी आपण प्रयन्तशील आहोत असे ते म्हणाले.
🟧 उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले, ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले त्यांना स्व. शामराव पेजे धन्यवाद देतील. शामराव पेजे यांचा वारसा पुढे चालवण्याचा कार्यक्रम कुणबी समाजाने घेतला आहे. 2022 पर्यत हे कुणबी भवन उभारून दाखवूच असेही त्यांनी सांगितले. कुणबी भवनासाठी जे जे लागेल ते देण्याचा प्रयत्न करू.
🟧 चिपळूण संगमेश्वरचे आमदार शेखर निकम बोलताना म्हणाले, कुणबी भवन होईल याची खात्री होती. या भवनासाठी शरद पवार यांच्या माध्यमातून 10 लाखाचा निधी देण्यात आला. वेगवेगळ्या माध्यमातून 50 लाख रुपये देण्याचा प्रयत्न करेन आणि हे कुणबी भवन उभं करण्यासाठी प्रयत्न करेन. कुणबी समाजाचे रखडलेले प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू असेही ते म्हणाले.
🟧 या कार्यक्रमात बोलताना काँग्रेसचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अविनाश लाड म्हणाले, आज हे जे कुणबी भवन उभं राहतं आहे त्यातुन कुणबी समाजाच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवला गेला आहे. कुणबी समाजाचे 40-50 वर्षा पूर्वीचे मूलभूत प्रश्न सोडवावेत असे त्यांनी व्यासपीठावरील मान्यवरांना सूचित केले.
🟧 रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत बोलताना म्हणाले, आज खऱ्या अर्थाने या कार्यक्रमात सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन राजकारण बाजूला ठेवुन उभारलेला कार्यक्रम आहे. कुणबी समाजाच्या विकासासाठी आणि उन्नतीसाठी कायम प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू असे सांगितले.
🟧 या पायाभरणी सोहळ्याला रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ऍड अनिल परब, सिंधुदुर्गचे पालकमंत्री, उच्च व शिक्षण मंत्री उदय सामंत, महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिवसेना सचिव व खासदार विनायक राऊत, जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, संगमेश्वर- चिपळूण विधानसभा मतदार संघाचे आमदार शेखर निकम, कुणबी समाज नेते सहदेव बेटकर, शिवसेना सह संपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक, शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके, रत्नागिरी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अविनाश लाड, खेडचे आमदार योगेश कदम, माजी खासदार हुसेन दलवाई, माजी आमदार सुभाष बने, माजी आमदार सदानंद चव्हाण, हुसनबानू खलफे, आमदार राजन साळवी, किसान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पराग पाष्टे, बहुजन विकास आघाडी अध्यक्ष सुरेश भायजे, माजी रत्नागिरी जि. प. अध्यक्ष रोहन बने, माजी जि. प. अध्यक्षा रचनाताई महाडिक, ओबीसी समाज अध्यक्ष शरदचंद्र गीते, संगमेश्वर-देवरुख सभापती जया माने, जि. प.सदस्या माधवी गीते, संगमेश्वर-देवरुख उपसभापती परशुराम वेल्ये, कुणबी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईचे अध्यक्ष सीताराम शिगवण, आंबेड खुर्द सरपंच चंद्रकांत फणसे, माजी जि. प. अध्यक्ष संतोष थेराडे, कुणबी समाजोन्नती संघ संगमेश्वर- देवरुखचे अध्यक्ष कृष्णा हरेकर, किसान काँग्रेस जिल्हाध्यक्ष दिलीप पेंढारी, रत्नागिरी जि. प. सदस्य शंकर भुवड, कुणबी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईचे अध्यक्ष दत्ताराम लांबे, कुणबी भवन बांधकाम समिती, राज मंडळ डेकोरेटर्सचे कडवई अध्यक्ष विजय कुवळेकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
🟧 सूत्रसंचालन संतोष थेराडे, विजय कुवळेकर, सुहास गेल्ये, विलास कानर यांनी केले.
*🚨रत्नागिरी 24 तास*
*अपडेट रहा, स्मार्ट बना…!*
*www.ratnagiri24taas.com*
*l ज्ञान l मनोरंजन l आरोग्य l टिप्स-ट्रीक्स l*
https://bit.ly/2XjFLVE
*………………………………………….*
▶️ *व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी JOIN असा मेसेज करा…*