सुरेश सप्रे, देवरुख
देवरूख – रत्नागिरी जिल्हा आणि पश्चीम महाराष्ट्राला जोडण्यासाठी महत्वाचा दुवा असलेला आंबा घाट अतीवृष्टीमुळे रस्ता खचल्यामुळे आणि दरडी कोसळल्यामुळे वाहतूकीस बंद करण्यात आला आहे. यामुळे नियोजित कुंडी घाटाचे अनेकवर्षे रखडलेले काम पुर्णत्वास गेल्यास आंबा घाटाला पर्याय ठरणारा कुंडी घाटाचे महत्व या समस्येमूळे पुन्हा एकदा प्रकर्षाने समोर आले आहे.
आंबा घाट हा कोल्हापुर,सांगली , सातारा यासह पश्चीम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना तसेच कर्नाटक राज्याला जोडणारा सर्वात सुरक्षित आणि जवळचा महामार्ग आहे. २२ जुलै रोजी झालेल्या जोरदार अतीवृष्टीमुळे हा घाट प्रथमच इतके दिवस वाहतूकीस ठप्प झाला आहे. तसेच पर्यायी मार्ग असलेले हे सुध्दा लांब पल्याचे आणि धोकादायक आहेत. आंबा घाटाला पर्यायी घाट म्हणून ओणी,पाचल व्हाया अणूस्कुरा किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण येथून गगनबावडा घाट, तळेरे येथून वैभववाडी मार्गे करुळ घाट किंवा नांदगाव तिठा येथून जाणारा फोंडा घाट तसेच कुभार्ली घाट हा कराड मार्गे जोडणारा घाट हे चार पर्यायी मार्ग आहेत. आंबा घाटा शिवाय जाणारे अन्य घाट हे अंतराच्या द्रुष्टीने विचार केला तर खुप लांब पल्याचे आहेत. शिवाय फोंडा घाट , कुंभार्ळी हे घाट रस्ते सुरक्षित आहेत.खारेपाटण जवळून जाणारा गगनबावडा घाट सुध्दा अतीवृष्टीच्या तडाख्यामुळे चार महीने इतक्या प्रदीर्घ काळासाठी वाहतूकीस बंद करण्यात आला आहे.अणुस्कुरा आणि करुळ घाट हे अतीशय धोकादायक आहेत.
आंबा घाटाला पर्यायी मार्ग म्हणुन संगमेश्वर तालुक्यातील कुंडी मार्गे पाटण ला जोडणारा कुंडी घाट तयार व्हावा यासाठी माजी मंत्री रवींद्र माने यांनी १९९६ साली युती शासनाच्या काळात कामाला सुरूवात केली होती.. नंतरच्या काळात हे काम अर्धवटच राहीले आहे.. संगमेश्वर तालुक्याचे माजी आमदार व कुंडी गावचे सुपुत्र सुभाष बने यांनी संगमेश्वर तालुक्यातील कुंडी मार्गे पाटण ला जोडणारा कुंडी घाट तयार व्हावा या महत्वाच्या प्रश्नाला अनेकदा शासन दरबारी पाठ पुरावा केला होता. आजही ते प्रयत्नशील आहेत. आता अतीवृष्टी मुळे आंबा घाट बद पडल्यानंतर कुंडी घाट होणे किती आवश्यक आहे हे पुन्हा एकदा या निमित्ताने अधोरीखीत झाले आहे.या घाटपुर्ण व्हावा म्हणून खा. विनायक राऊत यांनी पुढाकार घेवून हा बरेच वर्षे रेंगाळलेला घाटाचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी जनतेतून व्यक्त आहेत..