(संगमेश्वर / प्रतिनिधी)
साखरपा मद्यपान करुन गॅस टैंकर घेऊन जात असताना अपघात होऊन गाडीचे नुकसान झाले. हा अपघात रत्नागिरी – कोल्हापूर मार्गावरील आंबा घाटात झाला होता. अपघातप्रकरणी टैंकर चालक जनार्दन बडे याच्यावर देवरुख पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जनार्दन बडे हा गॅस टँकर (जीजे १२, एटी ७५९७) घेऊन पुण्याहून जयगडकडे चालला होता. आंबा घाटातील एका वळणावर आला असता त्याचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामध्ये गाडी रस्त्याच्या बाजूला खडकाला आदळली. यामध्ये गाडीचे नुकसान झाले. अधिक तपास देवरुख पोलिस करत आहेत.